ग्रंथोत्सवाची ग्रंथ दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथोत्सवाची ग्रंथ दिंडी
ग्रंथोत्सवाची ग्रंथ दिंडी

ग्रंथोत्सवाची ग्रंथ दिंडी

sakal_logo
By

पिंपरी, ता.१३ ः पिंपरी ते फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रो प्रवासामध्ये देशभक्तिपर घोषणांचा आणि मराठी साहित्याचा जागर ग्रंथ दिंडीमधून करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून दिंडीला सुरवात झाली. दिंडीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी तसेच महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. विविध घोषवाक्यांचे फलक लक्ष वेधून घेत होते. मेट्रो प्रवासानंतर चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिंडीचा समारोप झाला. प्रेक्षागृहातील कलादालनामध्ये विभाजन विभिषिका स्मरण दिनानिमित्त चित्रप्रदर्शनाचे आयोजन महापालिकेने केले आहे. देशाच्या फाळणीच्या घटनांचे निवडक माहितीपर चित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी नागरिकांसाठी २१ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे. शनिवारी दिवसभरात ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89889 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..