शहरात भाजपकडून अमृत महोत्सवाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात भाजपकडून अमृत महोत्सवाचा जागर
शहरात भाजपकडून अमृत महोत्सवाचा जागर

शहरात भाजपकडून अमृत महोत्सवाचा जागर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू झाले आहे. याची सुरुवात स्वतःपासून करीत भोसरीतील निवासस्थानी तिरंगा फडकावला. ‘हर घर तिरंगा’ या अभियानातून देशासाठी लढणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शहीदांचे, क्रांतिकारकांचे यानिमित्ताने शहरातील प्रत्येक नागरिक स्मरण करणार आहे, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हर घर तिरंगा उपक्रमासाठी पुढाकार घेतला. विविध उपक्रम राबवले. शहराचे नेते व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, शंकर जगताप, नितीन काळजे, राहुल जाधव, अमित गोरखे, एकनाथ पवार, नामदेव ढाके, अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडी, युवा मोर्चा यांचे पदाधिकारी यांनी तिरंगा फडकवत मोहीम यशस्वी केली आणि स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले.

उद्योगनगरी ‘तिरंगा’मय
‘हर घर तिरंगा’ या अभियानाला शहरांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तिरंगा देण्याची व्यवस्था केली आहे. शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध सोसायटी, महिला बचत गट, व्यावसायिक, विक्रेते, लघुउद्योजक या सर्वांना मोफत ध्वज दिले आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी, चौकात, विविध आस्थापना, कार्यालय यांनी ध्वज फडकवल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89915 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..