कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर आजपासून कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर आजपासून कार्यान्वित
कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर आजपासून कार्यान्वित

कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर आजपासून कार्यान्वित

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर प्रकल्प (सीसीसी) निगडीत उभारला आहे. त्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंटरच्या माध्‍यमातून स्मार्ट सिटी प्रकल्प सोमवारपासून (ता. १५) प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित केला जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली.
आयसीटीच्या पायाभूत सुविधांमध्ये डेटा सेंटर, क्लाऊड, नेटवर्क, सुरक्षा आणि शहरातील विविध सेवांशी जोडले जाण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर, नागरिक केंद्रित सेवा, स्मार्ट सिटी अॅप्स आणि वेब पोर्टल, स्मार्ट सुविधा आणि माहिती देणारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले या सर्वांचा समावेश आहे. या पायाभूत सुविधांमध्ये ऑप्टिकल फायबर, वाय फाय, वायर्ड बस, वायरलेस सेन्सर नेटवर्क्स, फाइव्ह-जी पर्यंतची कनेक्टिव्हिटी बँडविड्थ आणि लॉंग टर्म इव्होल्यूशन नेटवर्क यांचा समावेश केला आहे. महापालिका व स्मार्ट सिटीतर्फे हरित शहर, नव्याने विकसित झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम साजरा होत आहे. त्या अंतर्गत १७ ऑगस्टपर्यंत शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाद्वारे शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्ंयांचे आयोजनही केले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर अ क्षेत्रीय कार्यालयात
कंट्रोल ॲण्ड कमांड सेंटर मार्फत अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणारे स्मार्ट सिटी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्या माध्यमातून अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ८ पीए सिस्टीम, ८ व्हीएमडी, ६ किऑस्क्स, १५० ठिकाणी २९२ सीसीटीव्ही, ३३ वायफाय, ४ पर्यावरण सेन्सर्स, २ एटीसीएस, २ एसटीपी, १ डब्ल्यूपीएस, २६ घनकचरा वाहने, १ पार्किंग, १७०० वॉटर मीटर इत्यादी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण प्रकल्प शहरामध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे. एलअँडटी आणि टेक महिंद्रा या कंपन्यांद्वारे स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांचे कामकाज सुरू आहे.

कामकाजाचे होणार तटस्थपणे निरीक्षण
कमांड आणि कंट्रोल सेंटर हे आपत्तींचे व्यवस्थापन, विसंगत परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी आणि शहरातील विविध ऑपरेशन साठीचे नियंत्रण केंद्र मानले जाते. इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या साहाय्याने स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहनतळ व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन, स्मार्ट समुदायांचे व्यवस्थापन, स्मार्ट महापालिका व्यवस्थापन, स्मार्ट परिवहन व्यवस्थापन इत्यादी स्मार्ट सिटी संबंधित घटकांशी संपर्क स्थापित करणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे. या सर्व बाबी एकत्रित करून सिटी ऑपरेशन सेंटरची रचना अस्तित्वात आली आहे. त्याद्वारे संपूर्ण कामकाजाचे तटस्थतेने निरीक्षण केले जाणार आहे, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्वकाही
डॅशबोर्डच्या माध्यमातून आयसीसीसीमधील प्रत्येक घटकाचे लाइव्ह स्थिती समजण्यात मदत होणार आहे. याचबरोबर ऑटोमेशन आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणारी कामे आणि प्रक्रिया नियंत्रित करणे, विविध संस्थांबरोबर एकत्र काम करणे, समस्या शोधणे व त्यांचे निराकरण करणे, माहितीचे रिअल टाइम विश्लेषण आणि भविष्यवेधी बौद्धिक कौशल्य, जनजागृती आणि प्रतिसाद या कार्यपद्धतीद्वारे लोकांचा सहभाग, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने प्रतिसाद आणि आपत्ती व्यवस्थापन, शासकीय व्यवस्थेपर्यंत सुलभतेने पोहोचता येणे, योग्य वाहतूक नियंत्रण आणि व्यवस्थापन, शहराच्या आरोग्याशी संबंधित परिस्थितीचे यथायोग्य विश्लेषण आणि देखरेख, सुरक्षितता आणि कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे नागरिकांच्या वर्तनामध्ये बदल, शहराचा आत्मनिर्भर आणि बहुआयामी विकास करणे शक्य होणार आहे.
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90088 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..