साहित्य वाचनाने झाले लेखिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य वाचनाने झाले लेखिका
साहित्य वाचनाने झाले लेखिका

साहित्य वाचनाने झाले लेखिका

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः ‘‘साहित्य वाचनाने मी समृध्द झाले. जे भावले ते लिहित गेले आणि लेखिका झाले,’’ असे मत ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केले.
महापालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित व्याख्यानमालेत ‘चरित्र लेखन एक प्रवास’ विषयावर गवाणकर बोलत होत्या. गझलकार अनिल आठलेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त रविकिरण घोडके, राजन लाखे, उमेश पाटील, देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते. गावणकर म्हणाल्या, ‘‘माझे बालपण ग्रामीण भागात गेले. वडील फौजदार असल्याने पुस्तके उपलब्ध होती. त्यामुळे पुस्तके वाचनाची आवड निर्माण झाली. यामध्ये प्रवासवर्णने, चरित्रे, बखरी अधिक वाचल्या. साहित्य वाचनाने मी समृध्द झाले. जे भावले ते लिहित गेले आणि लेखिका झाले. ‘एक होता कार्व्हरच्या’ यशाने कुटुंबाचा माझ्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. लेखन प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वपूर्ण होता. चरित्र लेखनासाठी माहिती मिळवण्यासाठी तसेच संदर्भ गोळा करण्यासाठी खूप शोध घ्यावा लागला. चरित्र नायकांमधील निरंतरता, जिद्द, चिकाटी, सातत्य तसेच ठरवलेले शाश्वत काम शेवटपर्यंत करण्याचा ध्यास हे गुण मला भावतात. त्यातूनच चरित्र लेखनासाठी संशोधन करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

यादवांकडून इतिहासाला उजाळा
‘अझादी के दिवाने’ या पुस्तकाचे संपादक अनिकेत यादव यांचे ‘क्रांतिपर्वातील मूक साक्षीदार व भारतीय आरमाराची गौरवशाली परंपरा’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या क्रांतिकारकांचा त्याग आणि देशभक्ती या विषयी सचित्र वर्णन केले. तत्कालीन दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक घटना घडलेल्या स्थळांची तत्कालीन स्थिती आणि सद्यस्थिती याबाबतचे तुलनात्मक चित्र पुराव्यासह वर्णन केले. प्राचीन काळापासून भारताची असलेली आरमाराची गौरवशाली परंपरा याबाबतची प्राचीन लेणी, ताम्रपट, नाणी, शिल्प, दस्तावेज यांच्या माध्यमातून सचित्र माहिती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले उभारणी आणि आरमार उभारणी मागचे दुर दृष्टीकोन याबाबत सचित्र मार्गदर्शन यात्यांनी केले. आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या वास्तूंचे संवर्धन केले पाहिजे. त्यामधून येणाऱ्या पिढींना प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90167 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..