पिंपरी स्वातंत्र्य जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी स्वातंत्र्य जोड
पिंपरी स्वातंत्र्य जोड

पिंपरी स्वातंत्र्य जोड

sakal_logo
By

स्वातंत्र्य जोड
--
क्रांतितीर्थावर ‘गाणारे दगड...’
‘‘आपल्या अतिप्राचीन देशाचे सांस्कृतिक संचित जपणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे,’’ असे विचार महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी मांडले. चिंचवड येथील क्रांतितीर्थ चापेकर वाड्यात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने ‘गाणारे दगड ः बोलणारे पाषाण’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्षा डॉ. शकुंतला बन्सल, विश्वस्त मिलिंद देशपांडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, प्रभाकर कुंटे आदी उपस्थिती होते. वास्तूशास्त्र, शिल्पकला यांचे अद्भुत दर्शन घडविणाऱ्या आणि अठरा हजार वर्षांचा इतिहास कथन करणाऱ्या अनेक बाबी छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या आहेत, अशी माहिती कुटे यांनी दिली. मंगळवारपर्यंत (ता. १६) सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चापेकर वाड्यात विनाशुल्क प्रदर्शन खुले आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांनी उपनिषदामधील श्लोकांचे पठण केले. पोवाडा व कबीराचे दोह्ये सादर केले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90172 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..