विविध सेवांसाठी जीआयएस प्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध सेवांसाठी जीआयएस प्रणाली
विविध सेवांसाठी जीआयएस प्रणाली

विविध सेवांसाठी जीआयएस प्रणाली

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस (जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम) प्रणाली शहरातील मिळकतींसाठी वापरली जाणार आहे. त्यांची सुधारित सेवा, साहित्याचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती केले जाणार आहे.
महापालिकेच्या जीआयएस प्रकल्पाच्या इआरपी डेव्हल्पमेंट सेंटरचे उद्घाटन प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटी यांच्यातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. तसेच, जीआयएस, ईआरपी आणि डिजिटल वर्कफ्लो व्यवस्थापन सुरू झाल्यापासून एकात्मिक पद्धतीने विकसित केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत, महापालिकेच्या एक हजराहून अधिक प्रक्रियांवर व्यवसाय प्रक्रिया पुनर्रचना केली आहे. मिळकतीचे सर्वेक्षण व माहिती संकलित करण्यासाठी ऐटॉस इंडिया कंपनीमार्फत नियुक्त केलेले सर्व्हेअर व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत नागरिकांकडून आवश्यक माहिती घेण्यात येत आहे. ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंटची संपूर्ण कार्यक्षमता एकमेकांशी जोडलेली आहे. या उपक्रमांतर्गत, जीएसआयची कार्यक्षमता विभागांच्या दैनंदिन कामकाजाशी जोडली जाणार आहे. जेणेकरून महापालिकेचा जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येईल.

जीआयएस प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- शहरासाठी ‘लायडर’ सर्वेक्षण केले असून त्याद्वारे १० सेंटीमीटर एवढी लहान वस्तूही अचूकतेने मोजली जाऊ शकते
- झोपडपट्ट्यांमध्ये बॅकपॅकच्या सहाय्याने सर्वेक्षण केले जात असून त्याद्वारे संपूर्ण शहर ३६०-डिग्रीमध्ये टिपले गेले आहे
- उत्तम प्रशासनासाठी लायडर डेटा आणि जीआयएस बेस मॅपसह एकत्रित केला जाईल
- लायडर डेटा मालमत्ता कर डेटाबेससह एकत्रित करून अधिकाऱ्‍यांकडून मालमत्तांना प्रत्यक्ष भेट न देताही पडताळणी करता येईल
- जनवाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांसह २६० पेक्षा अधिक स्तर भूमिगत उपयुक्ततेचे संपूर्ण नेटवर्क आहे
- उपग्रहाद्वारे काढलेल्या शहर परिसराच्या डिजिटल प्रतिमेची खरेदी दर सहा महिन्यांनी नियमितपणे केली जाणार आहे
- अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमणे शोधून योग्य नियोजन किंवा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल
- शहराचे दृश्य थ्रीडी प्रतिमेमध्ये दाखवून सहा लाखहून अधिक मालमत्तांचे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे
- भूभागाचा अभ्यास व पाणी अडवण्याची ठिकाणे ओळखण्यासाठी शहराचे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यासही मदत होईल

जीआयएस हा सक्षम एकात्मिक प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. ज्या ठिकाणी महापालिका सर्व विभाग जीआयएस वातावरणात इआरपीद्वारे जोडले जातील. तसेच, एंटरप्राइझ-वाइड रिसोर्स प्लॅनिंग दृष्टिकोनाद्वारे महापालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा (डेटा) सर्वात चांगल्या प्रकारे वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90324 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..