शहरात देशभक्तिपर गीतांनी जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात देशभक्तिपर गीतांनी जल्लोष
शहरात देशभक्तिपर गीतांनी जल्लोष

शहरात देशभक्तिपर गीतांनी जल्लोष

sakal_logo
By

पिंपरी, ता.१६ ः ‘‘उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.” या ओळीप्रमाणे शहरात हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान, हर घर तिरंगा मन में तिरंगा घोषणांनी परिसर दुमदुमला. ठिकठिकाणी ‘हर घर तिरंगा'' अभियान जनजागृती फेरी काढली. राष्ट्रभक्तीपर गीते, घोषणा आणि वाद्यवादनाने सकाळपासूनच देशभक्तिपर माहोल तयार झाला होता. अशाप्रकारे शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर करण्यात आला.

महापालिका संचलित, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चिखली येथे शाळेच्या नूतन वास्तूमध्ये कार्यक्रम झाला. प्राचार्या डॉ.मृदुला महाजन, महापालिकेचे निवृत्त क्रीडा अधिकारी राजू कोतवाल, वाय.सी.एम. हॉस्पिटलमधील माजी फिजिओथेरपिस्ट विभाग प्रमुख डॉ. जयश्री कोतवाल, महापालिका क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षक ऐश्वर्या साठे, शाळेचे संचालक राजू महाराज ढोरे उपस्थित होते. शिक्षिका रचना बडवे यांनी प्रास्ताविक केले. संस्कृत शिक्षक सखाराम पितळे आभार मानले.

‘आयसीएआय’, निगडी
निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया( आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप केले. असोसिएशन ऑफ फ्रॉड एक्झामिनर (AFE) चे संचालक अविनाश मोकाशी यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यावेळी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय ध्वज वही, चित्रकला वही, शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी शाखाध्यक्ष विजयकुमार बामणे, उपाध्यक्ष सचिन बंसल, वैभव मोदी,खजिनदार सारिका चोरडिया, बबन डांगळे, सीए सुहास गार्डी उपस्थित होते.

प्रतिभा इन्स्टिट्यूट, चिंचवड
प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये यावेळी प्रमुख पाहुणे कर्नल आर.डी.सिंग यांच्याहस्ते ध्वजवंदन केले. यावेळी गौभक्त ललित गुंन्देशा, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा शशिकला शहा, शेवंती शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्य डॉ.क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. चिन्मया जैन, प्रा. सुरेखा कुंभार, प्रा. जस्मिन फराज यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले. डॉ. पल्लवी चूग यांनी आभार मानले.

सरस्वती भवन एज्युकेशन सोसायटी
फ्लाईंग बर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संस्थापक सचिव संभाजीराव शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा सादर केली. पर्यवेक्षिका जान्हवी पवार उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रणाली मोरे यांनी केले. सूत्रसंचालन लीना भिरूड यांनी केले. आभार पुनम लोखंडे हिने मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी
विद्यार्थी आणि पालकांनी हातात तिरंगा घेऊन परिसरात फेरी काढली. यावेळी सच्चिदानंद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भरत चव्हाण-पाटील, विश्वस्त श्वेता चव्हाण-पाटील, मुख्याध्यापिका छाया हब्बू, मुख्याध्यापिका जया श्रीनिवास, पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे, जयश्री पवार, अर्चना बनवली उपस्थित होते. शाळेच्या कमांडो पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, शीतल म्हात्रे, सरोज सूर्यवंशी, मधुरा कुलकर्णी, निषाद आपटे यांनी आयोजन केले. प्रास्ताविक सिरील जगन, तर आभार हलिमा खान यांनी मानले.

आम आदमी पक्ष
आकुर्डीत पिंपरी-चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी ध्वजारोहण झाले. खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. माजी सैनिक वाल्मीक बेंद्रे, माजी सैनिक दस्तगीर बक्षुद्दीन मुल्ला, किसन काळभोर, अण्णासाहेब कुराडे, विष्णुपंत गुल्हाने, भगवान बडगुजर, संपत शिंदे, ज्ञानेश्वर ननावरे, प्रकाश परदेशी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .

लोक जागर ग्रुप, आकुर्डी
डॉ.सुरेश बेरी यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यावेळी डीवायएफआयचे सचिन देसाई, आम आदमी पक्षाचे प्रकाश हगवणे यांनीही आपले विचार मांडले. रामदिन यादव व निशांत चौधरी यांनी देशभक्तिपर गीते गायली. याप्रसंगी राम नलावडे, गोकूळ बंगाल, सुधीर मुरूमकर, स्वप्नील जेवढे, एकनाथ पाठक, तुकाराम साळवी,अरुण सपाटे, भविन भंडारी, मेघना बेरी उपस्थित होते.

साई जीवन, चिखली जाधववाडी
राजे शिवाजीनगर सेक्टर १६ दत्त साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप, अजित गव्हाणे आणि कविता आल्हाट यांनी ध्वजवंदन केले. यावेळी गणेश ठोंबरे, ज्योती गोफणे,अंजुषा नेरलेकर, किशोर दुधाडे,बाळासाहेब मुळे उपस्थित होते.

घरकुल, साई चौक
चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. उच्च शिक्षणासाठी ९२ लाखाची शिष्यवृत्ती मिळविलेला धम्मरत्न गायकवाड याचा घरकुलवासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी के. जी. चावला शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. मल्हासार ढोल ताशा पथक यांनी वादन केले. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचलित पोलिस व नागरिक मित्र व शाखा क्रमांक १ घरकुल विभाग व अशोक मगर मित्रपरिवार यांच्या सहकार्याने नियोजन केले.


श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, महात्मा फुलेनगर
स्वातंत्र्यसेनानी पत्नी मुक्ताताई गजानन काकडे व उद्योजक सुनील बर्गे यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली. .याप्रसंगी विलास रूपटक्के यांनी संचलन केले, यशवंत कण्हेरे, विश्वास सोहनी, निर्मला धकाते, विद्या जोशी, वंदना सोहोनी यांनी मनोगत व्यक्त केले. शिवानंद चौगुले यांनी आभार व्यक्त केले.
--
शाहुनगर येथे ध्वजवंदन
चिंचवड येथील शाहूनगर मध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन केले. यावेळी महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ, साई मंदिर, अष्टविनायक गणेश मंदिर,यांच्या वतीने ध्वजवंदनाचे आयोजन केले होते. भाजपा उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांचे हस्ते ध्वजवंदन केले.
--
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पिंपरी
माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. प्रमुख पाहुणे म्हणून गुणवंत कामगार अण्णा जोगदंड, माजी नगरसेविका सुलोचना धर उपस्थित होते. माजी केंद्र संचालक सुरेख पवार यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊचे वाटप केले. लहान मुलांनीही भक्ती गीते गायली. केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी कल्याणकारी योजनाची माहिती दिली. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या शहर अध्यक्षा संजना करंजावणे, संगीता क्षीरसागर, यादव तळोले, श्यामराव गायकवाड, शंकर नानेकर, गोरखनाथ वाघमारे, उपस्थित होते.
--
गोखले वृंदावन गृहसंकुल, चिंचवडगाव
गृहसंकुलातील पदाधिकारी किरण येवलेकर, अतुल आंबेकर,भूपेंद्र केतकर, दिलीप तासे ,वसंत रानडे, सुभाष कर्णिक आदी ज्येष्ठ नागरिकांनी ध्वजवंदन करून घरोघरी तिरंगा आरोहण केले.
--
न्यू इंग्लिश स्कूल, चिंचवड
चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ चिंचवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा करून चिंचवडगावातून प्रभात फेरी काढली. तसेच ‘प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा’ अशा अनेक घोषणा देत जनजागृती केली. उपाध्यक्ष तानाजी निंबाळकर, कार्यवाह सुनील चिंचवडे, शिवाजी मंडळाचे प्रमुख गोडसे, गजानन भालेकर, माजी प्राचार्या प्रज्ञा जोशी, विजया विभांडिक, मुख्याध्यापिका योगिता बनकर, पर्यवेक्षिका माधवी कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा मुळूक यांनी केले.
--
अभिषेक विद्यालय, शाहूनगर
७५ स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो व माहिती यांचे प्रदर्शन करण्यात आले. विविध देशभक्ती दर्शविणारी रांगोळीची स्पर्धा घेण्यात आली. या व्यतिरिक्त देशभक्तिपर आधारित विविध नाट्य, नृत्य, भाषणे, गाणे यांचे आयोजन केले. १५ ऑगस्ट जन्मदिन असलेल्या पालक व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हेमंत हरहरे, गुरुराज चरंतीमठ, सुरेश कसबे, व्यवस्थापकीय संचालिका गीता चरंतीमठ उपस्थित होते.
--
श्रमजीवी बालक, प्राथमिक, माध्यमिक विद्यालय
मृणाली झावरे या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन केले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषेमधुन, नाटिकेतून देशप्रेम व्यक्त केले. संस्थेचे खजिनदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी गुलाबराव पुंडे, गुलाबराव गाढवे, सुरेश धनवे, दिलीप गुप्ता, संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत किसन दौंडकर, नंदकुमार श्रीपती ठाकूर, संचालक विश्वनाथ कोरडे, चंद्रकांत कोरडे, अजित गव्हाणे, राहुल गवळी, अनुराधा गोफणे, मुख्याध्यापक सुनील भसे, मुख्याध्यापक बाजीराव राक्षे, बालवाडी विभाग प्रमुख सुवर्णा बेलिडकर उपस्थित होते. मनोगत चंद्रकांत शिंदे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन राहुल ताकमोडे यांनी केले. शीतल ठाकूर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90402 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..