गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण
पिंपरी, ता. १७ : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण केली. त्यानंतर कोयता भिरकावून शिवीगाळ व आरडाओरडा करीत परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार चिंचवडगाव येथे घडला. याप्रकरणी विश्वजित आजिनाथ भोसले (रा. केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश नंदकुमार सांगळे (वय २०, रा. श्यामा हेरिटेज सोसायटी, चिंचवडगाव) व गणेश सुरेश सुगडे (वय २१, रा. केशवनगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची १३ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी येथे घडला. राकेश लोहार (रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांकधारक व बायकॉइन हे ॲप बनविणारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी व्हाट्सअप द्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

ताथवडेत दोन लाखांची घरफोडी
घरात शिरलेल्या चोरट्याने दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी सुभाषकुमार मोतीलाल (रा. राजमुद्रा कॉलनी शेजारी, ताथवडे ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घरफोडी करून फिर्यादी यांच्या घरात शिरलेलया चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी, कर्णफुल व रोकड असा एकूण एक लाख ९१ हजारांचा ऐवज लंपास केला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भोसरीत एकावर चाकूने प्राणघातक हल्ला
जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला. गोविंद संभाजी तांबवडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय विलास नागरे (वय १८), अभिषेक मारुती शिंदे (वय १८, दोघेही रा. माणगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहन तांबवडे (रा. दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तांबवडे हे भोसरीतील बैलगाडा शर्यत आखाडा येथे असताना पूर्वी झालेल्या भांडणातून आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांना अटक
जबरदस्तीने हॉटेलमध्ये शिरून तरुणाला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चौघांना अटक केली. हा प्रकार पिंपळे गुरव येथील काशीद पार्क येथे घडला. या प्रकरणी अनिल सेवानी (रा. पिंपरी) यांनी फिर्यादी दिली आहे. आशू उर्फ आसिफ हैदर हाफसी (वय २५), अत्तु ऊर्फ फैजल इस्माईल शेख (वय २७, दोघेही रा. कासारवाडी), ॲग्नल ऊर्फ केविन जॉर्ज ऍंथोनी (वय २९), सुमेरसिंग हरजितसिंग मान (वय २३, दोघेही रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणीची सव्वा सहा लाखांची फसवणूक
लग्न जमविण्याच्या बहाण्याने तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर आईच्या औषधोपचाराच्या नावाखाली सव्वा सहा लाख रुपये उकळून तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एस. के. शर्मा, अभिषेक शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी भारत मॅट्रोमोनियल साईटवरून फिर्यादी यांचा लग्ग्नाबाबतचा बायोडाटा घेतला. लग्न जमविण्याबाबत संपर्क साधून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आईच्या औषधोपचाराच्या नावाखाली फिर्यादीकडून वेळोवेळी फोन पे द्वारे सहा लाख २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चिखलीत कटरने वार करून ऐवज लुटला
मारहाण करीत कटरने वार करून रिक्षाचालक तरुणाकडील रोकड लुटली. हा प्रकार चिखली येथे घडला. अकबर इस्माईल शेख (रा. ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे,. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन कुदळवाडीतील स्पाईन रोडवरील पुलाखालून चालले होते.
दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. ''तू आमच्या गाडीला कट का मारला'' असे म्हणत त्यांना मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90580 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..