महिलेचा दुकानात शिरून भरदिवसा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 crime
भोसरीत दुकानात शिरून महिलेचा भरदिवसा खून

महिलेचा दुकानात शिरून भरदिवसा खून

पिंपरी - दुकानात शिरून एकाने महिला व्यावसायिकाची चाकूने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. १६) भोसरी येथे वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडली. पूजा देवी प्रसाद (वय ३२, रा. लोंढे आळी, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पूजा यांचे लोंढे आळी येथे कापड विक्रीचे दुकान असून मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दहाच्या सुमारास एक जण दुकानात आला. त्याने पूजा यांच्या गळ्यावर चाकूने वार केले.

दरम्यान, पूजा यांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्या दुकानाबाहेर आल्या. मात्र, रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पूजाच्या खुनामागील नेमके कारण समजू शकले नाही. हे कुटुंबीय मूळचे बिहार येथील असून २० ते २५ वर्षापासून पूजा या सासू, सासरा, पती व दोन मुलांसमवेत येथे राहत होत्या. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90606 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..