यंग बझ्झ -तिरंगा फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंग बझ्झ -तिरंगा फेरी
यंग बझ्झ -तिरंगा फेरी

यंग बझ्झ -तिरंगा फेरी

sakal_logo
By

यंग बझ्झ

पिंपरी, ता.१७ ः चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये‘हर घर तिरंगा’ प्रभात फेरी उत्साहात काढण्यात आली. पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ.‌ संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मानसी हसबनीस, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, तसेच रॅलीमध्ये नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी होते. या मार्गावर पालक, तसेच नागरिकांनी तिरंगा रॅलीचे स्वागत केले. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका संजना गायकवाड यांनी केले.
PNE22S84891

पिंपरी, ता.१७ ः ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी कैलास कमलाकर क्षीरसागर, इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शहराचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी संस्थापक डॉ.ललितकुमार धोका, व्यवस्थापकीय संचालक डॉ.स्वप्नाली धोका, प्राचार्या श्रीमती विद्युत सहारे, शिक्षक व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे ‘से नो टू प्लॅस्टिक’ या विषयावर पथनाट्य सादर केले. पाहुण्यांचा प्रेमाचे प्रतीक देऊन सत्कार करण्यात आला. संगीत शिक्षक ज्ञानेश्वर सर आणि विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गायले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय लिन्सी बिनॉय यांनी करून दिला. सूत्रसंचालन मनीषा वेदपाठक, लिन्सी बिनॉय आणि पूनम शेलकर यांनी केले. गोपाली डे यांनी आभार मानले.

PNE22S85058

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90827 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..