वितरण बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वितरण बातमी
वितरण बातमी

वितरण बातमी

sakal_logo
By

वितरण विभाग


पिंपरी, ता.१७ ः महात्मा फुले महाविद्यालयात '' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव '' विविध उपक्रम राबवून साजरा केला. ''घरोघरी तिरंगा'' मोहिमेअंतर्गत पिंपरी गावातून फेरी काढली. प्रभारी प्राचार्य डॉ.माधव सरोदे , महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख संजोग वाघेरे पाटील, हनुमंतराव नेवाळे, भाऊसाहेब वाघेरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप ननावरे, प्रा.डॉ.मिलिंद भंडारे, प्रा.डॉ.भारती यादव व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर , विद्यार्थी विकास मंडळ डॉ. पांडुरंग भोसले यांनी या जागृती फेरीमध्ये सहभाग घेतला.
PNE22S85074


पिंपरी, ता.१७ ः यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालक ,यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल व यशस्वी बालक मंदिरात ‘हर घर तिरंगा''अभियान अंतर्गत विद्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, सचिव डॉ.तुषार देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते आदी उपस्थित होते. सामूहिक माहितीची प्रात्यक्षिके सादर केली. निकिता कुऱ्हाडे, श्वेता हरणे, कोलम फुंडकर, पार्थ येवले, अमित तेलंगे, मोनिका चव्हाण, शालिनी उनवणे, योगेश्वर बिरादार, तनिष्का माने,मधू देशमुख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
PNE22S85070


पिंपरी, ता.१७ ः चिखली - महात्मा फुले नगरमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला. नागरिकांना लाडू वाटप केले. अतुल काळोखे, सुमीत कोंडे, स्वप्नील हराळ, अक्षय भापकर, प्रफुल मांजरे, आकाश वीर यांनी संयोजन केले. यावेळी अक्षय पवार, दयानंद पऱ्हाड, धनंजय जाधव, गणेश गोरे, प्रवीण ठोके, केतन चव्हाण, दीपक सावेडकर, संकेत जावळे, नरेंद्र भंडारी, समाधान बारस्कर, अभिजित तावरे, गौरव गांधिले, विनोद जाधव, प्रतीक बनकर, दीपक गोरीवले, अमित जाधव, विकास कदम, मनोहर गायकवाड, रणजित गायकवाड, आशीष जाधव, प्रवीण खोकर, अशोक बांदल उपस्थित होते.
PNE22S85069

पिंपरी, ता.१७ ः दापोडीतील गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार केला. संस्थेचे विश्‍वस्त गणेश पाटील, सावित्री पाटील, प्राचार्य दत्तात्रेय घारे, सिओना त्रिभुवन, नंदकुमार कणसे, तानाजी काटे, प्रल्हाद काटे, विश्‍वनाथ पाटील, उपस्थित होते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
PNE22S85076

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90840 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..