बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान : आमदार लांडगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बळीराजाला प्रोत्साहनपर 
अनुदान : आमदार लांडगे
बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान : आमदार लांडगे

बळीराजाला प्रोत्साहनपर अनुदान : आमदार लांडगे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या १४ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तातडीने ४ हजार ७०० कोटींची तरतूद केल्याबद्दल भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.
अडीच वर्षे केवळ घोषणाबाजी करणारे आघाडी सरकार गडगडल्यानंतर सत्तेवर येताच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे शिवसेना-भाजप युती सरकारने जाहीर केले होते. राज्यातील १३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या १४ लाख ५७ हजार कर्ज खात्यांमध्ये सुमारे पाच हजार कोटींचा निधी जमा होणार आहे. मोठा आर्थिक दिलासा देणारा हा निर्णय विनाविलंब अमलात यावा, यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तातडीने त्यासाठी ४ हजार ७०० कोटींची पुरवणी मागणी मंजूर करून घेऊन सरकारने आपली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.
ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय भाषणातून यासंबंधीचे आश्‍वासन देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
------------------------------------------