तळेगावात रंगला दहीहंडीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात रंगला 
दहीहंडीचा थरार
तळेगावात रंगला दहीहंडीचा थरार

तळेगावात रंगला दहीहंडीचा थरार

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २० ः तळेगाव स्टेशन येथील श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या पटांगणात माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या पुढाकाराने सामूहिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी अमिषा पटेल, पूजा बिररी, शरयू सोनवणे, समृद्धी केळकर, आरजे सोनाली, विजय अंदालकर या कलाकारांनी आपले कलागुण सादर केले. चेंबूर येथील दत्तगुरू गोविंदा पथक, घाटकोपर येथील कामराजनगर गोविंदा पथक यांनी सलामी दिली. फिल्मीगीते आणि म्युझिकवर तरुणाईने ताल धरला होता. अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र नागरिकांचा उत्साह जराही कमी झाला नाही. यावेळी वीरजवानांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. सांताक्रूझ येथील वाकोला नागरिक प्रतिष्ठान पथकाच्या गोविंदांनी रात्री दहाला दहीहंडी फोडली. यावेळी नागरिकांनी मोठा जल्लोष केला. दहीहंडीचे नियोजन अध्यक्ष शेखर मुऱ्हे, अँड. संविद पाटील, आशिष खांडगे आणि संतोष मोरे यांनी केले. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, गणेश खांडगे, रणजित काकडे, विक्रम काकडे, किरण काकडे उपस्थित होते. विशाल मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटोओळी:-
tas-20-8-22-P1-P2-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) ः श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या पटांगणात आयोजित केलेली दहीहंडी सांताक्रूज येथील वाकोला नागरिक प्रतिष्ठान पथकाच्या गोविंदानी फोडली.

.........................................................................................................................................................................................................

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91943 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..