राजीव गांधी आधुनिक भारताचे जनक : जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीव गांधी आधुनिक 
भारताचे जनक : जाधव
राजीव गांधी आधुनिक भारताचे जनक : जाधव

राजीव गांधी आधुनिक भारताचे जनक : जाधव

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : भारत देश संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महासत्ता म्हणून जगभर ओळखला जात आहे. भारतात संगणक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे राजीव गांधी हे भारतीय संगणक क्षेत्राचे जनक आहेत, असे युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले.
स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त शहर युवक काँग्रेसच्यावतीने त्यांच्या प्रतिमेला काळेवाडी, पिंपरी येथे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतीक जाधव, जमीर शेख, वसीम शेख, गौरव चौधरी, ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते.
जाधव म्हणाले की, अठराव्या वर्षी युवकांना मतदानाचा अधिकार राजीव गांधी यांनी मिळवून दिला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड विज्ञान पार्कची (सायन्स पार्क) मोफत सफर घडवून आणली. यावेळी येथील शास्त्रीय खेळणी व उपकरणांची माहिती मुलांना देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91986 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..