घरगुती व्यवसायाबाबतचे महिलांनी प्रशिक्षण घ्यावे ‘कुलस्वामिनी’च्या संस्थापिका सारिका शेळके यांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती व्यवसायाबाबतचे
महिलांनी प्रशिक्षण घ्यावे
‘कुलस्वामिनी’च्या संस्थापिका सारिका शेळके यांचे आवाहन
घरगुती व्यवसायाबाबतचे महिलांनी प्रशिक्षण घ्यावे ‘कुलस्वामिनी’च्या संस्थापिका सारिका शेळके यांचे आवाहन

घरगुती व्यवसायाबाबतचे महिलांनी प्रशिक्षण घ्यावे ‘कुलस्वामिनी’च्या संस्थापिका सारिका शेळके यांचे आवाहन

sakal_logo
By

देहू, ता. २१ ः घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांना मावळ तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापिका सारिका शेळके यांनी शनिवारी येथे केले.
सहारा संस्था आणि देहू शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने देहू परिसरातील महिलांसाठी विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप आणि महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी सारिका शेळके बोलत होत्या. या प्रशिक्षण शिबिरात पन्नास महिलांनी प्रशिक्षण घेतले.
देहू शहर राष्ट्रवादी महिलाध्यक्षा रेश्मा मोरे, लता फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा परंडवाल, सहारा संस्थेच्या अध्यक्षा आसिफा बागवान, नगरपंचायतीचे गटनेते योगेश परंडवाल, तेजल मालपोटे, उपाध्यक्षा शारदा परंडवाल, छाया ढवळे उपस्थित होते.
शारदा परंडवाल यांनी सूत्रसंचालन केले. शिवानी परंडवाल यांनी आभार मानले. मीना बिरदवडे, ज्योती विधाटे, राजश्री परंडवाल, सुगंधा कारंडे, वैशाली बिरदवडे यांनी आयोजन केले होते.
फोटो ः ८५८३७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92074 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..