माझ्या आनंदाचा चंद्र भर उन्हात शोधतो... प्राधिकरणात रंगली नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा; संतोष गाढवे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या आनंदाचा चंद्र भर उन्हात शोधतो...
प्राधिकरणात रंगली नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा; संतोष गाढवे प्रथम
माझ्या आनंदाचा चंद्र भर उन्हात शोधतो... प्राधिकरणात रंगली नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा; संतोष गाढवे प्रथम

माझ्या आनंदाचा चंद्र भर उन्हात शोधतो... प्राधिकरणात रंगली नवयुग श्रावणी काव्यस्पर्धा; संतोष गाढवे प्रथम

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः ‘रानभैरी रानवेडा मी गा रानात हिंडतो, माझ्या आनंदाचा चंद्र भर उन्हात शोधतो...’ या ओळी आहेत चांदूस (ता. खेड) येथील कवी संतोष गाढवे यांच्या. निसर्गाचे वर्णन केलेल्या या कवितेला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. निमित्त होते, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळातर्फे आकुर्डी प्राधिकरणात आयोजित एकोणतिसाव्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यस्पर्धेचे.
प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात स्पर्धा झाली. कीर्तनकार किसनमहाराज चौधरी, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, नवयुगचे कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव माधुरी ओक, संचालक नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आणि ‘कथा स्वातंत्र्याची’ या ग्रंथांचे पूजन केले. काव्यलेखन आणि सादरीकरण अशा दोन स्तरांवर झालेल्या स्पर्धेत ८९ कवींनी सहभाग घेतला. ५७ कवींची सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यातून संतोष गाढवे (रानभैरी) प्रथम, अभिजित काळे (मेघावली) द्वितीय, रेखा कुलकर्णी (श्रावण आला) तृतीय, सुप्रिया लिमये (नाद पावसाचा) आणि अरुण कांबळे (डाव) उत्तेजनार्थ यांनी पारितोषिक पटकाविले. रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. सहभागी सर्व कवींना ग्रंथ, लेखणी आणि ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी प्रास्ताविक केले. सुहास घुमरे आणि माधुरी विधाटे यांनी परीक्षण केले. संपत शिंदे आणि अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी ओक यांनी आभार मानले. अनिकेत गुहे, उज्ज्वला केळकर, रजनी अहेरराव, अरविंद वाडकर, चिंतामणी कुलकर्णी, शरद काणेकर यांनी संयोजन केले.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92093 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..