कलासागरकडून कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ ः वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलासागरकडून कर्मचाऱ्यांच्या
कलागुणांना व्यासपीठ ः वाघ
कलासागरकडून कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ ः वाघ

कलासागरकडून कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ ः वाघ

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : टाटा मोटर्सच्या कलासागर या सांस्कृतिक शाखेमुळे गेल्या ५० वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ दिले, या शब्दांत टाटा मोटर्सच्या कमर्शिअल व्हेईकल बिझनेस युनिटचे (सीव्हीबीयू) कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी कलासागरचे कौतुक केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित टाटा मोटर्स कलासागरच्या सुवर्ण महोत्सव समारंभात ते बोलत होते. त्यावेळी टाटा मोटर्सच्या पुणे येथील प्रकल्पाचे (सीव्हीबीयू) प्रमुख आलोक कुमार सिंह, मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष सीताराम कांदी, उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष विनय पाठक, ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष अजॉय लाल, टाटा मोटर्स कलासागरचे अध्यक्ष सुनील सवाई, सरचिटणीस रोहित सरोज उपस्थित होते. कलासागरच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
गिरीश वाघ म्हणाले, ‘‘टाटा मोटर्स पुणे प्रकल्पाचे संस्थापक सुमंत मुळगावकर यांच्या दूरदृष्टीमुळे शहरातील ओसाड माळरानावर उभी राहिलेली ही कंपनी फक्त व्यवसाय न करता विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्यांच्या प्रयत्नातून कलासागर ह्या सांस्कृतिक शाखेची स्थापना झाली. ही संस्था गेली ५० वर्षे कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देत आहे. वर्धापन दिनानिमित्त तयार केलेला लोगो हा आधुनिकतेची फार सुंदर कलाकृती आहे.’’
आलोक कुमार सिंह म्हणाले, ‘‘कलासागर ही संस्था आमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी संधी देते. या संस्थेने अनेक चांगले कलाकारही दिले आहेत’ कलासागर टेक्निकल टीमने यशोगाथा दाखविणारे गाणे तयार केले आहे. त्याचे प्रकाशन दीपाली वाघ व भारती लाल यांनी केले. माजी अध्यक्ष व सरचिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांना पोलिओ ड्रॉप्स देण्यामध्ये मदत केलेल्या सात स्वयंसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अजॉय लाल यांनी आभार मानले. तर, रोहित सरोज यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92115 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..