निगडीतील ई बस डेपो आगारात घाणीचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीतील ई बस डेपो आगारात घाणीचे साम्राज्य
निगडीतील ई बस डेपो आगारात घाणीचे साम्राज्य

निगडीतील ई बस डेपो आगारात घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By

ई बस डेपो आगाराला घाणीचा विळखा
व्यवस्थापकाच्या केबिनला उतरती कळा : चारही बाजूंनी दलदल आणि अस्वच्छता

पिंपरी, ता. २१ : शहरभर स्वच्छतेचा नारा सुरू असताना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आगाराला मात्र घाणीने विळखा दिला आहे.
चक्क निगडीतील ई (इलेक्ट्रीक) बस डेपो आगारात सांडपाणी, अस्वच्छ पाण्याच्या टाक्या, पाणीगळती, चिखलमय परिसर, दलदल आणि दुर्गंधीमुळे तीन कर्मचाऱ्यांना डेंगी झाल्याचे उघडकीस आले आहे.
‘सकाळ’ प्रतिनिधीने शनिवारी (ता. २०) दुपारी एकला ई बस डेपो आगारात भेट दिली असता, आगारात काही इ बस लागलेल्या होत्या. त्या ठिकाणी मॅकेनिक काम करत होते. तर, डेपो व्यवस्थापक बसलेल्या कार्यालय हे अंधारी कोठडीप्रमाणे दिसले. डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादूर्भाव झालेला होता. शिवाय, वीजबत्ती गुल झाल्याने केबिनमध्ये पाऊल ठेवणे देखील धोकादायक होते. शिवाय, खुर्च्या तुटलेल्या होत्या. छताला भोके पडलेली होती. पावसाचे पाणी भिंतीवरुन पाझरत होते. त्यासाठी छताला काही ठिकाणी थर्माकोल लावले होते. मात्र, छताची उतरती कळा पाहता छत कधीही कोसळेल, अशी परिस्थिती दिसून आली.
सुरक्षारक्षकाच्या केबिनजवळ असलेल्या पाण्याच्या अस्वच्छ टाकीतून चालक व वाहक पाणी बाटल्यांमध्ये भरुन नेत होते. तसेच, पाण्याच्या बाटल्या दिवसभरासाठी भरुन ठेवत होते. सभोवताली असलेल्या छतांवर गवत पसरले होते. त्यामुळे विंचू काट्याची भीती मोठ्या प्रमाणात जाणवत होती. शिवाय, आगारात भंगार ठिकठिकाणी विखुरलेले होते. त्यामुळे, एकूणच आजारांना आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती समोर आली. चिखल आणि दलदलीने डेपोमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही. गेल्या आठवड्यात याच डेपोसमोर काही टवाळखोरांनी हाणामारी केली. त्यात एकाचा पाय तोडला असल्याने या भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे समोर आले आहे. निगडीतील हा डेपो बंद होणार आहे. नवीन डेपो सुरु होण्यासाठी किमान ६ ते ८ महिने लागणार आहेत. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून परिस्थिती जैसे थे आहे. नवीन डेपो तयार होईपर्यंत मात्र, कर्मचारी नरकयातना भोगत आहेत.
--
गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही जीव मुठीत घेऊन काम करतोय. तिघा जणांना डेंगी झाला. कामावरुन घरी थांबावे लागले. मात्र, १५ दिवस उपचार घेऊन पुन्हा कामावर रुजू झालो. मात्र, या ठिकाणी असलेली घाण हटवलेली नाही. अस्वच्छतेने आम्ही हैराण झालो आहे. इकडे कोणी झाडायला येत नाही की, औषध फवारणीला फिरकत नाही.
- एक कर्मचारी, निगडी
--
फोटोः 85868, 85869, 85870, 85871

निगडी ः ई (इलेक्ट्रीक) बस डेपो आगारात सांडपाणी, अस्वच्छ पाण्याच्या टाक्या, पाणीगळती, चिखलमय परिसर, दलदल आणि दुर्गंधीमुळे
कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादूर्भाव झला आहे. खुर्च्या तुटलेल्या आहेत. छताला भोके पडलेली आहेत. पावसाचे पाणी भिंतीवरुन पाझरत आहे. मात्र, प्रशासनाचे इकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92121 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..