शंकरवाडीतील मंदिरात भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंकरवाडीतील मंदिरात
भाविकांची गर्दी
शंकरवाडीतील मंदिरात भाविकांची गर्दी

शंकरवाडीतील मंदिरात भाविकांची गर्दी

sakal_logo
By

आकुर्डी, ता. १४ : नाशिक फाट्याजवळील शंकरवाडी येथील ओम नमः शिवाय मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी वाढत आहे. १९७० मध्ये बांधलेले हे मंदिर वास्तुशास्त्राचा नमुना आहे. पूर्व दिशेला असलेल्या या मंदिरातील शंकराच्या पिंडीवर सूर्याची किरणे मंदिरात पडतात. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात शंकराची अगदी सुंदर आणि लक्षवेधी पिंड आहे. पिंडीच्या शेजारी पार्वतीची मूर्ती साकारण्यात आली आहे. घंटेचा आवाज, मंत्रमुग्ध करणारे भजन, मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यातून वाहणारे पाणी आणि मंदिराच्या बाहेर असणारे निसर्गरम्य वातावरण यामुळे कित्येक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.
श्रावणात या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक, होम हवन, भजन कीर्तन नामस्मरण सतत चालू असते. अर्थात वर्षभर अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी खूप रांगा या मंदिरासमोर असतात. महाप्रसादाचे वाटप सतत चालू असते. मंदिरात आल्यावर दर्शन करताना शिवलिंग व पार्वती मातेची मूर्ती प्रत्येक भाविक भक्ताचे मन मोहून घेते. शंकरवाडी गावातील मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, महिला भजनी मंडळ व तसेच पहाटे सहा ते रात्री नऊ काकडा आरती, भजन व पूजा चालते. तसेच संध्याकाळी साडेसहाला आरती होते. ही सर्व व्यवस्था तानाजी चोंधे व ग्रामस्थ मिळून करतात.
फोटो ः ८४५६१

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92133 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..