रंगरेषांनी साकारल्या वैज्ञानिक संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगरेषांनी साकारल्या वैज्ञानिक संकल्पना
रंगरेषांनी साकारल्या वैज्ञानिक संकल्पना

रंगरेषांनी साकारल्या वैज्ञानिक संकल्पना

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः बाहेर पावसाच्या तुरळक सरी कोसळत असताना आतील कक्षांमध्ये विज्ञान साहित्य व उपकरणांच्या सानिध्यात बसून शालेय विद्यार्थी चित्र रंगवत होते. रविवारची (ता. २१) हक्काची सुटी असूनही त्यांची मने सायन्स पार्कमध्ये रंगरेषेंच्या दुनियेत रमली होती. निमित्त होते महापालिका सायन्य पार्क, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) आणि अनुउर्जा विभाग यांच्यातर्फे विज्ञान महोत्सवांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेचे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायन्स पार्कमध्ये विज्ञान महोत्सव आयोजित केला आहे. त्याचा प्रारंभ रविवारी (ता. २१) चित्रकला स्पर्धेने झाला. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चौथी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा झाली. त्यात विविध शाळांमधील ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘प्रदूषण विरहित वसुंधरा’ अशा विषयावर आपापल्या संकल्पनेतून त्यांनी चित्रे रेखाटून रंगवली. विज्ञान महोत्सवाअंतर्गत शुक्रवारपर्यंत (ता. २६) विविध स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.

आजपासूनचे कार्यक्रम
- सोमवार (ता. २२) ः सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्ग जतन व संवर्धन’ विषयांवर निबंध स्पर्धा होईल
- मंगळवार (ता. २३) ः सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नविकरणीय उर्जा’ विषयावर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल
- बुधवार (ता. २४) ः सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ‘मनोरंजक रसायनशास्र’ विषयावर कार्यशाळा होईल
- गुरुवार (ता. २५) ः दुपारी साडेबारा वाजता गंमतीशीर विज्ञान प्रयोग, व्याख्यान व प्रात्याक्षिके होतील. त्यासाठी सर्वांना प्रवेश असेल
- शुक्रवार (ता. २६) ः सकाळी ११ वाजता विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, व्याख्यान; दुपारी १२ वाजता शिक्षकांसाठी ‘विज्ञान प्रकल्प पद्धती’ विषयी कार्यशाळा
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92196 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..