जागतिकीकरणाच्या अयोग्य वापराने देशाची आर्थिक स्थिती बिकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिकीकरणाच्या अयोग्य वापराने 
देशाची आर्थिक स्थिती बिकट
जागतिकीकरणाच्या अयोग्य वापराने देशाची आर्थिक स्थिती बिकट

जागतिकीकरणाच्या अयोग्य वापराने देशाची आर्थिक स्थिती बिकट

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः ‘‘देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. यासाठी केवळ सध्याचे सरकार जबाबदार नसून जागतिकीकरणाचा योग्य पद्धतीने स्वीकार न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे,’’ असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी गोडबोले बोलत होते. उपआयुक्त रविकिरण घोडके, महारष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उमेश पाटील आदी उपस्थित होते. गोडबोले म्हणाले, ‘‘जागतिकीकरणामुळे निम्न मध्यमवर्ग मध्यमवर्गात गेला. मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात गेला. मात्र, ही प्रगती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता निर्माण झाली. बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी निर्माण झाली. प्रगती ठराविक शहरांपर्यंत मर्यादित राहिली. जीडीपी वाढीच्या तुलनेत अपेक्षित रोजगार निर्मिती झाली नाही. पूर्वेकडील देशांनी शिक्षण, आरोग्य, संशोधन यावर मोठ्याप्रमाणात खर्च केल्याने ते आज चांगल्या स्थितीत आहेत. या परिस्थितीतून भारताला बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य, संशोधन, पायाभूत सविधा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. त्या सुविधा तळागळातील लोकांपर्यंत पोहचवाव्या लागतील. आर्थिक विषमता ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. विषमता असेल आर्थिक संकट येऊ शकते. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अपेक्षित खर्च करून सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण केल्यास विषमता कमी होण्यास मदत होईल. सामाजिक पायाभूत सुविधा निर्मितीमुळे भारत प्रचंड प्रगती करेल.’’
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92349 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..