हजारो विद्यार्थ्यांचे आधार ‘नो अपडेट’ विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हजारो विद्यार्थ्यांचे आधार ‘नो अपडेट’  
विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता
हजारो विद्यार्थ्यांचे आधार ‘नो अपडेट’ विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता

हजारो विद्यार्थ्यांचे आधार ‘नो अपडेट’ विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता

sakal_logo
By

पिंपरी, ता.२२ ः सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी शाळांची आहे. यासाठी, आधार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले. मात्र, शहरातील महापालिका आणि खासगी शाळांना विद्यार्थ्यांप्रती गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वारंवार सूचना देवूनही हजारो विद्यार्थ्यांच्या आधार विषयीची माहिती ‘सरल स्टुडंट पोर्टल’वर अपडेट केली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

आधार कार्ड हे आता केवळ प्रौढ व्यक्तींसाठीच नव्हे तर शालेय मुलांसाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. शासनातर्फे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार शहरात अशा हजारो विद्यार्थ्यांची पोर्टलवर नोंद आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म अपूर्ण असल्याने या योजनेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहणार, असा सूर शिक्षक व पालक वर्गातून उमटत आहे.
काही पालकांनी तास न तास रांगेत थांबून आधार बनवले. मात्र या कार्डमधील पुरावे देऊनही झालेल्या चुका दुरुस्तीसाठी नागरिक, विद्यार्थी, पालकांना नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सध्या सहन करावा लागत आहे. शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या बँक खात्यासाठी ही आधारकार्ड लागत आहे. ते नसल्यामुळे बँक खाते व शिष्यवृत्ती मिळणे कठीण झाले आहे. निदान शाळा स्तरावर तरी तातडीने फिरते आधारकार्ड केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिक्षक, पालक, विद्यार्थी वर्गातून होत आहे.

विद्यार्थी आधारकार्ड अभावी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु असे असूनही शहरातील महापालिका, अनुदानित, विना अनुदानित कायमविना अनुदानित व सेल्फ फायनान्स माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून हजारो विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाही. यासाठी शाळांना ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. या शाळांनी ३० ऑगस्टपर्यंत अपडेट न केल्यास विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास शाळा जबाबदार असेल असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.


शैक्षणिक संस्थांना आदेश
शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढून, आपल्या विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना हे आदेश यापूर्वीच दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचा तपशील संगणकावर तत्काळ उपलब्ध व्हावा यादृष्टीने, तसेच विविध योजनांतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना अचूकपणे लाभ देण्यासाठी आधार क्रमांकाची व त्यांच्या बँक खात्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


कोट
विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासंदर्भात वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरी देखील हजारो विद्यार्थ्यांचे अद्यापही आधार बाकी आहे. शाळांचा यातून हलगर्जीपणा आणि विद्यार्थीप्रती गांभीर्य नसल्याचे दिसून येते. अशा शाळांमुळे जर विद्यार्थी योजनांपासून वंचित राहिले तर कारवाई करण्यात येईल.
-सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92594 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..