स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये कौशल्य विकास कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये 
कौशल्य विकास कार्यशाळा
स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये कौशल्य विकास कार्यशाळा

स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये कौशल्य विकास कार्यशाळा

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २९ ः तळेगाव येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये ‘शाडूच्या मातीचे श्रीगणेशा’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरवात प्रमुख मान्यवर विल्सेन सालेर, पांडुरंग पोटे, आतिश थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, सुनील खोल्लम, योगेश शिंदे, सचिन कोळवणकर, विलास टकले, मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, शिल्पकार आतिश थोरात, कला शिक्षक विजय जाधव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वनिर्मितीचा निखळ आनंद मिळावा व पर्यावरणाच्या संरक्षणाची भावना रुजावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापिका शेख यांनी सांगितले. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा कार्यशाळेचा हेतू आहे. यामध्ये शाळेतील पाचशे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि श्रीगणेशाच्या मनमोहक मूर्ती तयार केल्या.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक व कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आयेशा सय्यद यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे, बाळासाहेब शिंदे यांनी केले. ‘पर्यावरण वाचविण्यासाठी पाऊल उचलू, जीवनाला अनुकूल बनवू’ असा संकल्प यावेळी करण्यात आला.

तळेगाव दाभाडे (स्टेशन) ः स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचे श्रीगणेशाच्या मूर्ती तयार केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92734 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..