नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात प्लेसमेंट प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नामांकित कंपन्यांमध्ये 
विद्यार्थ्यांना संधी 
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात प्लेसमेंट प्रक्रिया
नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात प्लेसमेंट प्रक्रिया

नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात प्लेसमेंट प्रक्रिया

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः डॉ. डी. वाय. पाटील आकुर्डी शैक्षणिक संकुलातील कॉर्पोरेट रेलेशन्स व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत आहे. वार्षिक वेतन सहा लाखांपासून ४५ लाखापर्यंत मिळत असून, त्यांच्या करिअर विकासाला संधी मिळाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्लेसमेंट प्रक्रिया सुरू असून, इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, अप्लाइड आर्टस् अँड क्राफ्ट्स आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन मुलाखत होऊन ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲमिरिस लॅब्स, बायजूस, व्होडाफोन, आयडिया, व्हर्चुसा, व्हेरिटास, व्हॅल्यूलॅब्स, राजा सॉफ्टवेअर, जोश सॉफ्टवेअर, ऐकोलाइट, बिर्लासॉफ्ट, दीपक फर्टिलायझर, इवोसिस, डेल्टा एक्स अशा कंपन्यांमध्ये मुलांची निवड होत आहे. विपरीत परिस्थितीत विद्यार्थ्यांना २२ लाखांचे सर्वाधिक पॅकेज मिळाले आहे. उत्कृष्ट दर्जाच्या प्रयोगशाळा व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा संकुलात आहेत. वेबिनारद्वारे उद्योगांतील बदलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. कुशल, अनुभवी प्राध्यापकांमुळे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व अभ्यासेत्तर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत. त्यांना संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या उपक्रम विषयक प्रदर्शनासाठी कॅम्पसमध्ये चारशेपेक्षा जास्त सामंजस्य करार नामांकित कंपन्यांबरोबर केले आहेत. मागील वर्षी दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रत्येक वर्षी चारशेहून अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस मुलाखतीसाठी येतात. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, ट्रस्टी तेजस पाटील, कॅम्पस संचालक डॉ. नीरज व्यवहारे, प्राचार्य डॉ. पी. मालती आणि डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. अरविंद कोंडेकर, डॉ. के. निर्मला, डीन प्लेसमेंट्स जस्मिता कौर यांनी मार्गदर्शन केले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92753 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..