परदेशी टोळीकडून समुदेशक महिलेची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी टोळीकडून समुदेशक महिलेची फसवणूक
परदेशी टोळीकडून समुदेशक महिलेची फसवणूक

परदेशी टोळीकडून समुदेशक महिलेची फसवणूक

sakal_logo
By

कांगोतील महिलेला दिल्लीमध्ये अटक

परदेशी टोळीकडून समुदेशक महिलेची फसवणूक

पिंपरी, ता. २३ : मॅट्रिमोनियल साईटवरून घटस्फोटित महिलेशी बनावट नावाने संपर्क साधून, अमेरिकेत डॉक्टर असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखवले. आईच्या उपचारासाठी, औषधी बियांच्या व्यवसायासाठी तसेच विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगत महिलेकडून साडे बारा लाख रुपये उकळले. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या परदेशी टोळीतील एका कांगो महिलेला वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. तिच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
बियू न्यामएमबीलो ऑक्टव्ही (वय २८, सध्या रा. शिवनहल्ली, येलहंका, बेंगलोर, कर्नाटक, मूळ- कांगो ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वाकड येथील महिलेने पोलिसात फिर्याद दिलेली आहे. त्या समुदेशक आहेत. महिला आरोपीने फिर्यादीची मेट्रीमोनियल साईटवरून माहिती घेतली. त्यानंतर महिला आरोपीने तिच्या साथीदाराने डॉ. अर्जुन नावाने फिर्यादीशी संपर्क साधला. अमेरिकेत डॉक्टर असल्याचे सांगून, फिर्यादीशी ओळख वाढवली. लग्न करून भारतात स्थायिक होण्याचे आमिष दाखवले. तसेच आईच्या उपचारासाठी बेंगलोर येथील औषधी बिया पाठविण्यासाठी बनावट बिया विकत घेण्यास भाग पडले. तसेच औषधी बियांचा व्यवसाय करण्याचे सांगून व भारतात विमानतळावर ग्रीन कार्ड नसल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगितले. अशी विविध कारणे सांगून फिर्यादीला बारा लाख २९ हजार ४०० रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली. तांत्रिक तपासादरम्यान आरोपी महिला बेंगलोरमधूनच हा गुन्हा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक जानेवारी २०२२ मध्ये बेंगलोरला गेले असता, आरोपी महिला महिन्यांपूर्वीच परदेशात गेल्याचे समोर आले तर तिचा साथीदार तेथे राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी येथे सापळा रचला. मात्र, तो अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा पाठलाग करताना त्याच्याकडील बॅग सापडली. त्यामध्ये एक लॅपटॉप, पेनड्राइव्ह, दोन मोबाईल सापडले होते. सोसायटीत चौकशी केली असता महिला आरोपी तिच्या साथीदारांसह तेथे राहत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, महिला आरोपीचा पासपोर्ट क्रमांक प्राप्त करून तिची माहिती विमानतळ प्रशासनाला दिली होती. अखेर ती दिल्ली विमानतळावर आली असता, वाकड पोलिसांनी तिला अटक केली. पुणे न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92918 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..