गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

जीएसटीचे पैसे न भरता
व्यावसायिकाची फसवणूक

पिंपरी, ता. २३ : जीएसटीचे पैसे कार्यालयात न भरता तसेच कच्चा माल घेण्यासाठी पैसे घेऊन माल न पुरवता व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे घडला.
याप्रकरणी राजेश शिशुपाल पंघल (रा. सुखवानी, अजमेरा, पिंपरी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय मित्तल (वय ५०), आशिष अशोक जैन (वय ३०), प्रदीप रामकेशरी गौड (वय ४५), यासह महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. पंघल यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय असून दोन कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून पंघल हे कच्चा माल घेतात व तो बिलिंग करून दुसऱ्या कंपनीला पुरवठा करतात. पंघल यांनी आरोपींकडून कच्चा माल घेतला होता. त्याचे जीएसटी सहित बिल त्यांनी आरोपींना दिले होते. जीएसटीसाठी पंघल यांनी दिलेले ५५ लाख ८४ हजार रुपये आरोपींनी जीएसटी कार्यालयात भरले नाहीत. त्यामुळे पंघल यांना ९३ लाख ८८ हजार ५०२ रुपये एवढी जीएसटीची दंडासहित रक्कम भरावी लागली. तसेच कच्चा माल घेण्यासाठी पंघल यांनी आरोपींना ९ लाख ६२ हजार ९४४ रुपये दिले होते. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी कच्चा माल पंघल यांना दिला नाही. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

बावधनमध्ये दोन ऑफिस फोडून
पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी, ता. २३ : दोन ऑफिसचे शटर उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरला. या घटना बावधन येथे घडल्या.
याप्रकरणी दशरथ शिवराज भद्रशेट्टे (वय ३२, रा. अमेय अपार्टमेंट, म्हाळुंगे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पाटीलनगर, बावधन येथे संगम एंटरप्रायझेस व रोहित मारुती सोनवणे (रा. नवी सांगवी) यांचे लिंक लॉजिस्टिक हे दोन्ही ऑफिस कुलूप लावून बंद होते. दरम्यान, दोन चोरट्यांनी ऑफिसचे शटर, कॅमेरा व ग्रील तोडून आत शिरले. २ लाख ७६ हजार ३८४ रुपयांची रोकड व बिलिंगसाठी वापरत असलेली मशिन चोरट्यांनी लंपास केली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.
-------------

प्रवासी महिलेचा विनयभंग करीत
रिक्षाचालकाला मारहाण

पिंपरी, ता. २३ : रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. तसेच आरोपीला रोखणाऱ्या रिक्षाचालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना निगडीतील थरमॅक्स चौक येथे घडली.
विशाल हरीश पलंगे (वय ३४, रा. खंडोबा माळ, आकुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या थरमॅक्स चौकातून रिक्षाने प्रवास करत होत्या. त्यावेळी रिक्षाचा पाठलाग करत आरोपी आला. त्याने रिक्षाजवळ येऊन महिलेबद्दल अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. त्यामुळे रिक्षाचालकाने आरोपी विशालला शिवीगाळ केली. त्यावरून विशालने रिक्षाचालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेली असता विशालने तिच्यावर हात उगारला.
------------

व्यावसायिकाची ४४ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. २३ : रस्त्याच्या कामाच्या बदल्यात पैसे, जागेचा ताबा न देता व्यावसायिकाची ४४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार कासारसाई येथे घडला.
याप्रकरणी कुंदन रामचंद्र काटकर (वय ३३, रा. रावेत) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित देवराम कलाटे (वय ३२, रा. वाकड चौक) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्लॉटिंग डेव्हलपमेंट मधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात कलाटे यांनी फिर्यादी काटकर यांचे ४४ लाख २० हजार रुपये देणे होते. मात्र, पैसे न देता कलाटे यांनी काटकर यांना कासारसाई येथील साडेसहा गुंठे जागा देतो असे सांगितले. मात्र, कलाटे यांनी जागेचा ताबा न देता तसेच पैसेही न देता काटकर यांची
फसवणूक केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92937 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..