सेंट्रल पंचायत समितीच्या अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट्रल पंचायत समितीच्या
 अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी
सेंट्रल पंचायत समितीच्या अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी

सेंट्रल पंचायत समितीच्या अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : सिंधी समाजातील सगळ्यात पहिली संघटना सेंट्रल पंचायत समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी तर, कार्याध्यक्षपदी महेश मोटवानी यांची एकमताने निवड झाली आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष महेश मोटवानी यांनी सांगितले, की ‘पिंपरी समाजातील तसेच, इतर समाजातील व्यापारी आणि समाज बांधव यांच्या सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करेल. चालिहो साहेब शोभायात्रा २४ ऑगस्टला बुधवारी दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत असून, पिंपरीतील शोभायात्रेच्या मार्गावरील व्यापारी बांधवांनी दुकानासमोर वाहने उभी करून नयेत. यात्रेस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
संस्थेच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी शिवनदास पंमनानी, कार्याध्यक्षपदी महेश मोटवानी, उपाध्यक्षपदी इंदरलाल बजाज, दीपक लोहाना, सचिवपदी मनोहर जेठवानी, सहसचिवपदी अजित कंजवानी, खजिनदारपदी मोती रामवानी, हिशोब तपासनीसपदी श्रीचंद नागरानी, कायदे सल्लागारपदी अॅड. सुशील बजाज, प्रसिद्धी प्रमुखपदी नंदू भोगले, सल्लागारपदी गोपीचंद आसवानी व नारायण नाथानी, सदस्यपदी भगवानदास खत्री, सुशील मंगतानी यांची निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92943 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..