चिंचवड येथील श्री मंगलमूर्तींची रविवारपासून भाद्रपद यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवड येथील श्री मंगलमूर्तींची 
रविवारपासून भाद्रपद यात्रा
चिंचवड येथील श्री मंगलमूर्तींची रविवारपासून भाद्रपद यात्रा

चिंचवड येथील श्री मंगलमूर्तींची रविवारपासून भाद्रपद यात्रा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती पालखीची भाद्रपद यात्रा रविवारपासून (ता. २८) सुरू होत आहे. सहा सप्टेंबर रोजी यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.

पालखी प्रस्थानाच्या निमित्त रविवारी (ता. २८) मिरवणूक काढण्यात येईल. त्यात अश्व, पुण्यातील श्रीगजलक्ष्मी ढोल पथक असेल. दुपारी बारा वाजता पालखी श्री क्षेत्र मोरगावकडे प्रस्थान करेल. मंगलमूर्ती वाडा ते समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड मार्गे भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, पुण्यातील वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असेल. सोमवारी (ता. २९) पहाटे साडेचार वाजता पालखी पुण्यातून मोरगावकडे मार्गस्थ होईल. भवानीपेठ, रामोशी गेट, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात पालखी मुक्काम असेल. तेथून मंगळवारी (ता. ३०) सकाळी पालखी निघेल. शिवरी, रासकर मळा, जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल. बुधवार (ता. ३१) आणि गुरुवारी (ता. १ सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगावतच असेल. शुक्रवार, २ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. जेजुरी, कऱ्हाबाई मंदिर, दिव्य वाटिका आश्रम वडकी असे मुक्काम करत पालखी ६ सप्टेंबर रोजी चिंचवड येथील मंदिरात येईल.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93076 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..