गणेशोत्सव परवान्यासाठी एक खिडकी योजना महापालिका आयुक्त यांची माहिती; सुटीच्या दिवशीही सुरू राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव परवान्यासाठी एक खिडकी योजना
महापालिका आयुक्त यांची माहिती; सुटीच्या दिवशीही सुरू राहणार
गणेशोत्सव परवान्यासाठी एक खिडकी योजना महापालिका आयुक्त यांची माहिती; सुटीच्या दिवशीही सुरू राहणार

गणेशोत्सव परवान्यासाठी एक खिडकी योजना महापालिका आयुक्त यांची माहिती; सुटीच्या दिवशीही सुरू राहणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः गणेशोत्सवासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. गणेश मंडळांना महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून विविध परवानग्या देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांत कार्यान्वित एक खिडकी योजना सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवा, असा आदेश महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव ३१ ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर या कालावधीत साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेण्यासाठी महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, शहर अभियंता मकरंद निकम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रभागस्तरावर सार्वजनिक गणेश मंडळे, गृहनिर्माण संस्था, अशासकीय संस्था, पर्यावरणवादी संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करावे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी विसर्जन स्थळांची पाहणी करून घाट निश्चित करावेत. त्या ठिकाणांची यादी नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी. कंट्रोल रूम तयार करून, त्याद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवावे आदी सूचनाही आयुक्तांनी केली.

गणेश मंडळांना सूचना
- मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना कार्यान्वित
- परवानग्या देण्याची सुविधा शनिवार, रविवार अशा सुट्यांच्या दिवशीही सुरू असेल
- परवानगीसाठी महापालिकेकडून शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, अटी-शर्तींचे पालन बंधनकारक

महापालिका प्रशासनाला आदेश
- गणेशोत्सव मिरवणुकीचे मार्ग, सर्व विसर्जन घाट सुव्यवस्थित करावे, विद्युत व्यवस्था करावी
- नदीतील पाणीपातळी लक्षात घेऊन, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी
- नदी घाटांवरील कृत्रिम विसर्जन हौदांची डागडुजी करून आवश्यकतेनुसार नव्याने हौद तयार करावेत

विसर्जन घाटांवर पुरेशा प्रमाणात कर्मचारी नेमावेत. जीवरक्षकांची नेमणूक करावी. महत्त्वाच्या घाटांवर रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवावे.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी नागरिकांनी महापालिकेने निश्चित केलेल्या घाटांवर व कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- मंचक इप्पर, पोलिस उपआयुक्त

गणेशमूर्तींची संख्या यावर्षी वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने फिरते कृत्रिम हौद आणि मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उपलब्ध करून द्यावेत.
- आनंद भोईटे, पोलिस उपआयुक्त
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93290 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..