संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम देहूत जागर, अभिषेक, महापूजा व कीर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत सेना महाराजांच्या 
पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
देहूत जागर, अभिषेक, महापूजा व कीर्तन
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम देहूत जागर, अभिषेक, महापूजा व कीर्तन

संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम देहूत जागर, अभिषेक, महापूजा व कीर्तन

sakal_logo
By

देहू, ता. २५ : श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त देहूतील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात व नाभिक समाज धर्मशाळेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 
श्री संत तुकाराम मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत महाराज मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तसेच नाभिक समाज धर्मशाळेत जागर, अभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. राम महाराज वाळूंजकर यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी देहू नाभिक समाज धर्मशाळेचे अध्यक्ष विजय रसाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन कदम, धर्मशाळेचे सचिव माऊली आढाव, दिंडी अध्यक्ष गणपत पवार, रामदास कदम, माऊली पांडे, बबन गायकवाड, रवींद्र राऊत, सीताराम वाळुंजकर, देहू नाभिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश पांडे, विजय गवळी, शारदा कुटे आदी उपस्थित होते. 
नितीन महाराज मोरे म्हणाले, ‘‘संतांच्या विचाराने महाराष्ट्राची संस्कृती घडत असून, त्यांनी दिलेल्या विचाराने आपण वाटचाल करीत आहोत. श्री संत सेना महाराज हे देव, देश व धर्म याचे पालन करीत काम करणारे संत होते. त्यांचे कार्य खूप मोठे आहे.’’ 
या कार्यक्रमास देहू ग्रामस्थांसह मावळ तालुक्यातील येलघोल, मोरवे, तुंगी, आंबेगाव, हाडशी, वाळीन, कोळवन, शिळीम येथील समाजबांधव व देहू नाभिक संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
फोटो ः 86700

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93498 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..