निसर्गातील उत्कृष्ट कारागीरीचा नमुना म्हणजे सुगरणीचे घरटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गातील उत्कृष्ट कारागीरीचा 
नमुना म्हणजे सुगरणीचे घरटे
निसर्गातील उत्कृष्ट कारागीरीचा नमुना म्हणजे सुगरणीचे घरटे

निसर्गातील उत्कृष्ट कारागीरीचा नमुना म्हणजे सुगरणीचे घरटे

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २५ ः तळेगाव परिसरात बाभळीच्या बारीक फांदीवर सुगरण पक्षांनी आपल्या पिल्लासाठी घरटी बनवित असताना पाऊस, वाऱ्यामुळे घरटे उद्ध्वस्त होऊन बाभळीच्या काटेरी फांदीत उलटे होऊन अडकले. मात्र, पिल्लासाठी घरटे बनवत असताना ते उद्ध्वस्त झाल्याची तमा न बाळगता सुगरणीने पुन्हा जिद्दीने नव्याने घरटे बनविण्यास सुरवात केली.
जून ते आॅगस्ट दरम्यान पिवळा धम्मक (नर) व चिमणी सारखी दिसणारी सुगरण (मादी) हिरव्या गवताच्या काडीने घरटी विणतात. घरट्याच्या खालील बाजूस प्रवेशद्वार, खाली निमुळते व उलट्या चंबूच्या आकारचे घरटे असते. विणीच्या हंगामात सुगरण पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी घरटे आत जाऊन पुन्हा-पुन्हा तपासून बघते. सुगरण एकावेळी दोन ते चार अंडी घालते. अंडी उबविणे व पिल्लांना खाऊ घालण्याचे काम सुगरणच करते. सुरगणीचा खोपा म्हणजे निसर्गातील उत्कृष्ट कारागीरीचा नमुना. यामुळेच सुगरणीचे घरटे बांधणीच्या कलेला निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी यथार्थपने काव्यबध्द केले. ‘अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला.’

तळेगाव दाभाडे (स्टेशन)- बाभळीच्या झाडावर आपल्या पिलांसाठी घरटे बनविण्यात मग्न झालेली सुगरण.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93549 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..