आणखी पाच जणांना अटक शिपाईभरती प्रकरण ः एकूण ५१ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी पाच जणांना अटक 
शिपाईभरती प्रकरण ः एकूण ५१ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल
आणखी पाच जणांना अटक शिपाईभरती प्रकरण ः एकूण ५१ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

आणखी पाच जणांना अटक शिपाईभरती प्रकरण ः एकूण ५१ आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : पिंपरी - चिंचवड पोलिस शिपाई भरती दरम्यान मैदानी व लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत ५१ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी पाच आरोपींना जालना, संभाजीनगर व बीड येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी व रोकड जप्त केली. अटक आरोपींचा आकडा ५६ वर पोहोचला आहे.

ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय २९, रा. मु.पो. लोधेवाडी, ता. बदनापूर जि. जालना), कार्तिक ऊर्फ वाल्मीक सदाशिव जारवाल (वय २३, रा. मु. पो. एकबुर्जी वागलगाव , ता. गंगापूर, जि. औरंगाबाद ), अरुण विक्रम पवार (वय २६, रा. मु.पो. अंथरून पिंपरी, जि. बीड), अर्जुन विष्णू देवकाते (वय २८, रा. मु.पो. कवडगाव , ता. वडवणी, जि. बीड), अमोल संभाजी पारेकर (वय २२, रा. काळेची वाडी, पो. भोगलेवाडी, ता. धारूर . जि. बीड ) या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत ७२० जागांसाठी पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा १९ नोव्हेंबरला सहा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांची ११ ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत हडपसरमधील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बळ गट क्रमांक एक येथे मैदानी चाचणी घेतली. त्यात जीवन त्र्यंबक काकरवाल (वय २३, रा. मु. पो. रघुनाथपुरवाडी, ता. वैजापूर, जी. औरंगाबाद) याच्या अर्जावरील फोटो व स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मैदानी परीक्षा डमी परीक्षार्थीमार्फत दिल्याचे तसेच लेखी परीक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस वापरून लेखी परीक्ष दिल्याचे समोर आले. अधिक चौकशीत रवींद्र गुसिंगे व चरणसिंग काकरवाल यांनीही गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्यांच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान यापूर्वी ५१ जणांना अटक केली. त्यातील २६ जण या भरतीमध्ये उमेदवार होते. तसेच ७५ हून अधिक आरोपी पसार आहेत. यातील बाराजण पात्र न झालेले उमेदवार आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी तयार केलेल्या पथकांनी पाच जणांना अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात आतापर्यंत ५१ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

७६ मोबाईल जप्त

या आरोपींकडून ७६ मोबाईल, ६६ इलेकट्रोनिक स्पाय डिव्हाईस, २२ वॉकीटॉकी संच, ११ वॉकीटॉकी चार्जर, ११ लाखांची रोकड, शंभरहून अधिक ब्ल्यू-टूथ, मोबाईल व स्पाय डिव्हाईस लपविण्यासाठी वापरलेले कपडे , विविध कंपन्यांचे सिमकार्ड व कागदपत्रे जप्त केली.
-------------
सहा टोळ्यांचा पर्दाफाश
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी औरंगाबाद, जालना, बीड येथे कार्यरत असलेल्या व परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या सहा टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नागपूर, अमरावती, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वीसपेक्षा अधिक वेळा दुर्गम परिसरात जाऊन आरोपींना अटक केली.
-----------
असा करायचे गैरप्रकार


पोलिस भरतीचा पेपर फोडण्यासाठी आरोपींनी विशिष्ट टी शर्ट तयार केला. डमी उमेदवार छिद्रे असलेले शर्ट परिधान करून परीक्षेला बसायचे. या शर्टला आतील बाजूला असलेल्या कप्प्यात डीव्हाइस ठेवायचे . त्या डीव्हाइसला लेन्सच्या माध्यमातून छिद्रे असलेलया टी शर्टमधून आरोपी समोरील पेपरचे फोटो काढून बाहेर पाठवायचे. तसेच हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर एका उमेदवाराने मास्कमध्ये डिव्हाईस बसविल्याचेही समोर आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93615 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..