पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव 
जनजागृती अभियान
पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ : संस्कार प्रतिष्ठान आणि आदर्श बालक मंदिर व ज्ञानदेव बालक मंदिर शिवनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी शिवनगरी परिसरातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले. डॉ. मोहन गायकवाड यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले.

विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा म्हणून आवाहन केले. गणेशोत्सव सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळा, सजावटीसाठी थर्माकोलचा वापर टाळा, गणेशमूर्ती शाडूमातीची वापरा, मूर्ती शक्यतो लहान आकाराची घ्या. सजावटीसाठी प्लास्टिक फुलांचा वापर टाळा. गणेश विसर्जन शक्यतो घरच्या-घरीच करा, असे आवाहन केले.

मुख्याध्यापक विनोद मुळके, शिक्षक विद्या काळे, प्रदीप नागरगोजे, आनंद कुमदाळे, माधुरी कुंजीर, सरला पाटील, माधुरी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष शब्बीर मुजावर, खजिनदार मनोहर कड, प्रो.सुभाष चाटे, प्रो. मारुती शेलार, प्रभाकर मेरुकर, स्वप्नील सुतार, सतीश उघडे, विलास चोळसे, मच्छिंद्र राजगुरव आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93790 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..