पात्र असूनही सुमारे १२ वारसांना महापालिकेत नोकरीला मुकावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पात्र असूनही सुमारे १२ वारसांना महापालिकेत नोकरीला मुकावे
पात्र असूनही सुमारे १२ वारसांना महापालिकेत नोकरीला मुकावे

पात्र असूनही सुमारे १२ वारसांना महापालिकेत नोकरीला मुकावे

sakal_logo
By

पिंपरी, ता.२६ ः ‘‘माझे वडील आरोग्य खात्यात मुकादम होते. ड्युटीवर असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपात तत्वावर नोकरी मिळण्यासाठी अनेक अर्ज केले. सात-आठ वर्षापासून महापालिकेचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, शासनाच्या तिसरे अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अपात्र ठरवत आहे’’, अशी खंत सचिन शिंदे (नाव बललेले) यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली. परिणामी पात्र असूनही सुमारे १२ वारसांना महापालिकेत नोकरीला मुकावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

महापालिकेच्या सेवेमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला शासकीय सेवेमध्ये अनुकंपा तत्वावर घेतले जाते. दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांचा पात्र वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षांच्या आत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करावा लागतो. त्यांना दिवंगत कर्मचाऱ्याच्या जागेवर सामावून घेतले जाते. मात्र, २०१७ मध्ये सरकारने ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांस अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नसल्याचा आदेश काढला. त्यामुळे महापालिकेतील १२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयाचा मोठा फटका बसला आहे.

परिणामी नोकरीसाठी अर्ज करून पात्र असूनही या वारसांना महापालिकेत नोकरी मिळत नाही. त्यामुळे मयत झालेल्या कुटूंबाची मोठी परवड होत आहे. या कर्मचाऱ्यांचे वारस महापालिकेकडे येऊन वारंवार नोकरीबाबत विचारणा करत आहेत. मात्र, शासनाच्या आदेशामुळे त्यांना महापालिकेत नोकरी नाही.


कोट
‘‘ राज्य शासनाने २०१७ मध्ये जारी केलेल्या आदेशामुळे संबंधित मयत झालेल्या कर्मचाऱ्याला २००१ नंतर तीन अपत्य असतील तर त्यांना सेवेत घेता येणार नसल्याचा आदेश आहे. ही अट वगळ्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. ’’
– बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त, प्रशासन विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93880 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..