आई मातृत्वाची महान देणगी ः पाटील-महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई मातृत्वाची 
महान देणगी ः पाटील-महाराज
आई मातृत्वाची महान देणगी ः पाटील-महाराज

आई मातृत्वाची महान देणगी ः पाटील-महाराज

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २७ ः येथील जैन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (ता. २६) मातृदिन साजरा करण्यात आला.
स्कूलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे होत्या. प्रमुख वक्ते हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी ‘लेकुराचे हिता, वाहे माऊलीचे चित्त’ या संत तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ देत पुरुषोत्तम महाराज म्हणाले, ‘आई ही अपकाराची परतफेड उपकाराने करणारी धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती आहे. मातृत्वाची महान देणगी तिला मिळाली आहे.’ संत ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांच्या विरहाचा प्रसंग कथित करताना महाराजांसह उपस्थित श्रोते भावुक झाले. ते पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज साऱ्या जगाची माऊली झाले, त्याप्रमाणे प्रत्येकीने होण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, म्हणाल्या की हल्लीच्या मातांनी स्वतःचाही विचार करून काळजी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक मुलाची आई सशक्त असेल तरच भारत देश सशक्त राहील.
संस्थेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश ओसवाल, संचालक दिलीप वाडेकर, राकेश ओसवाल यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण परळीकर, दिलीप पारेख, संकेत ओसवाल, प्रतीक म्हाळसकर, हभप माऊली दाभाडे, ज्येष्ठ पत्रकार अमिन खान आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान यश मिळविलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच दहा मातांना गौरविण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. यावेळी स्कूलच्या तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका विजया शिंदे, अपूर्वा टकले व शुभांगी भोईर, शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्यासह विद्यार्थी आणि पालक माता मोठ्या संख्येने उपस्थित होत.
प्रास्ताविक प्रकाश ओसवाल यांनी केले. सूत्रसंचालन कविता फाकटकर व आरती पेंडभाजे यांनी केले. राकेश ओसवाल यांनी आभार मानले.


तळेगाव दाभाडे (स्टेशन) : तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलमध्ये मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देताना हभप पुरुषोत्तम महाराज पाटील.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93974 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..