लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचे आमिष दाखवून
डॉक्टर तरुणीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अत्याचार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २६ : लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर अत्याचार केला. शिवीगाळ, मारहाण करीत घरात डांबून ठेवले. पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत तरुणीच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
या प्रकरणी पीडित डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजीम नूरमहंमद तांबोळी (वय ३१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. आरोपीने फिर्यादीशी प्रेमाचे नाटक करीत लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. लग्नाबाबत विचारले असता, त्यास नकार देऊन फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. घरात डांबून ठेवत बाहेरून कुलूप लावले. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी या क्लिनिकला गेलेल्या असताना आरोपी त्यांच्या घरी गेला. त्याच्याकडील चावीने कुलूप उघडून तो घरात शिरला. घरामधील सामान अस्ताव्यस्त फेकून वस्तूंची तोडफोड करीत नुकसान केले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93989 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..