पाणी टंचाईसाठी खरपूड गावाला सोलरप्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी टंचाईसाठी 
खरपूड गावाला सोलरप्रणाली
पाणी टंचाईसाठी खरपूड गावाला सोलरप्रणाली

पाणी टंचाईसाठी खरपूड गावाला सोलरप्रणाली

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : खेड तालुक्यातील खरपूड गावाला पाणीटंचाई सारख्या समस्येचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात देखील अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील महिलांना एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वृद्ध महिलांचे खूप हाल होतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, गावातील पाणी समस्या निवारणासाठी महिंद्रा हेवी इंजिन लि. आणि यश फाउंडेशनने खरपूड गावात सोलर सिस्टीम बसवून ग्रामस्थांची पाणी समस्या सोडवली आहे.

सोलर पीव्ही प्लांट उद्‍घाटन सोहळा महिंद्रा हेवी इंजिन लि. चाकणचे प्लांट हेड संजय शिरसागर यांच्या हस्ते झाले. या सोलर प्लांटचा फायदा खरपूड गावातील ६०५ ग्रामस्थांना होणार आहे. गावठाण जागेत ५ हजार फळ झाडांची लागवड करण्यात आली आहे.

उपक्रमास प्लांट हेड संजय शिरसागर, चंचल मर्तिया, सुभाष नायर, स्मिता पिल्लई, उमा शंकर यादव, हेमंत चव्हाण, नीलेश सावंत, खरपूड गाव सरपंच यमुना राजू मदगे, ग्रामविकास अधिकारी सुरेश अंकुश घनवट, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, थ्रिजी सोलर एनर्जी सिस्टिम संचालक दीपक तारू, यश फाउंडेशनचे स्वयंसेवक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94166 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..