कर संकलन विभागाकडून तीनशे कोटींची वसुली महापालिका ः साडेचार महिन्यांत टप्पा पूर्ण, आॅनलाईनद्वारे १८६ कोटींचा भरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर संकलन विभागाकडून तीनशे कोटींची वसुली
महापालिका ः साडेचार महिन्यांत टप्पा पूर्ण, आॅनलाईनद्वारे १८६ कोटींचा भरणा
कर संकलन विभागाकडून तीनशे कोटींची वसुली महापालिका ः साडेचार महिन्यांत टप्पा पूर्ण, आॅनलाईनद्वारे १८६ कोटींचा भरणा

कर संकलन विभागाकडून तीनशे कोटींची वसुली महापालिका ः साडेचार महिन्यांत टप्पा पूर्ण, आॅनलाईनद्वारे १८६ कोटींचा भरणा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः महापालिकेच्या कर संकलन विभागाने साडेचार महिन्यांत ३०० कोटी रुपये वसुलीचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक १८६ कोटींचा भरणा ऑनलाइन माध्यमातून झाला आहे. पुढील साडेसात महिन्यांत विभागास ६९३ कोटींची वसुली करण्याचे टार्गेट पूर्ण करायचे आव्हान समोर ठाकले आहे.

कर संकलन विभागाकडून निवासी व बिगरनिवासी मिळकतींना कर आकारून त्यांची विविध १७ विभागीय कर संकलन कार्यालयांकडून वसुली केली जाते. कर संकलन विभागाकडे ५ लाख ७८० हजार मिळकतींची नोंद आहे. मिळकतकरांच्या बिलाची वसुली १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ अशी वर्षभर केली जाते. एक एप्रिल ते २२ ऑगस्ट या साडेचार महिन्यांच्या कालावधीत एकूण ३०६ कोटी ९१ लाख ४३ हजारांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. आतापर्यंत एकूण लाख २६ हजार ५ मिळकतधारकांनी बिल भरले आहे. सर्वाधिक १८६ कोटी १८ लाख हजारांचा भरणा ऑनलाइन माध्यमातून झाला आहे. त्याद्वारे एकूण १ लाख ४९ हजार २७९ नागरिकांनी बिल भरले आहे. रोखीने ४३ हजार १८० मिळकतधारकांनी ३२ कोटी ९५ लाख २६ हजारांचा भरणा केला आहे. तर, धनादेशाद्वारे १० हजार २५४ जणांनी ४१ कोटी ७८ हजार ७१ हजार रुपये जमा केले आहेत. डीडीद्वारे १७७ नागरीकांनी ७ कोटी ६४ लाख ७० हजार जमा झाले आहेत. दरम्यान, कर संकलन विभागासमोर वर्षभरात १ हजार कोटींचे वसुलीचे टार्गेट आहे. आतापर्यंत सुमारे ३ लाख ५२ हजार मिळकतधारकांनी बिल भरलेले नाही. पुढील साडेसात महिन्यांत ६९३ कोटींची वसुली करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.


कोट
शहरातील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात येत आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुदतीमध्ये बिल अदा न केल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी थकबाकीसह मूळ मिळकतकर असे संपूर्ण बिल भरून जप्तीची कारवाई टाळावी.
-नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग

आकडे बोलतात
-भरणा पद्धत - मिळकतधारक - रक्कम
-रोखीने - ४३ हजार १८० - ३२ कोटी ९५ लाख २६

-धनादेशाद्वारे -१० हजार २५४ -४१ कोटी ७८ हजार ७१ हजार

-डीडीद्वारे - १७७ - ७ कोटी ६४ लाख ७० हजार

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94288 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..