उर्से टोलनाका येथे टोलवसुली सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उर्से टोलनाका येथे
टोलवसुली सुरूच
उर्से टोलनाका येथे टोलवसुली सुरूच

उर्से टोलनाका येथे टोलवसुली सुरूच

sakal_logo
By

सोमाटणे, ता. २८ ः तात्पुरती टोलवसुली थांबवण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही उर्से टोलनाका येथे आज दिवसभर टोल वसुली सुरुच होती.
रस्त्याच्या डागडुजीचे सुरु असलेल्या कामामुळे ऐन गणपती उत्साहात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती अकरा सप्टेंबरपर्यंत टोल वसुली थांबवावी, असे आदेश दिले होते. या आदेशानंतरही आज दिवसभर उर्से टोलनाका येथे नियमितपणे टोल वसुली सुरुच होती. याबाबत संबंधित
अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, अद्याप कोणतेही लेखी आदेश आम्हाला मिळाले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. या तात्पुरती टोलवसुलीमुळे किमान गणपती उत्सवाच्या काळात गावाकडे ये-जा करताना आपणास टोलपासून मुक्ती होईल, अशी अपेक्षा गावाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना
वाटत होती. परंतु सर्वच वाहनचालकांची निराशा झाली.
-----------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94300 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..