कॉलेजमधील भांडणातून दोन गटात हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉलेजमधील भांडणातून 
दोन गटात हाणामारी
कॉलेजमधील भांडणातून दोन गटात हाणामारी

कॉलेजमधील भांडणातून दोन गटात हाणामारी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : कॉलेजमध्ये परीक्षेतील कॉपीवरून दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. त्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. आकुर्डीतील महाविद्यालयाजवळ सुरवातीला एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणाला मारहाण केली. त्यानंतर निगडीतील एका शाळेजवळ दुसऱ्या गटातील तरुणाला मारहाण करून, त्याचे अपहरण केले.
अथर्व संदीप केदारी (वय १८, रा. देहू-आळंदी रोड, चिखली) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, साहिल जाधव (रा. आदर्शनगर, किवळे), कार्तिक कट्टीमणी (रा. देहूरोड) व पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर, कार्तिक नामदेवराव कट्टीमणी (वय १८, रा. गांधीनगर, देहूरोड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व संदीप केदारी, प्रतीक शिवाजी पाटील, अजय जाधव, उदय कदम (सर्व रा. पाटीलनगर, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अथर्व व कार्तिक तसेच इतर आकुर्डीतील एका महाविद्यालयात शिकत आहेत. कॉलेजमध्ये अथर्व व साहिल यांच्यात परीक्षेतील कॉपीवरून वाद झाला. यावरून शुक्रवारी (ता. २६) दुपारी पावणे एकला कार्तिक व त्याच्या साथीदारांनी अथर्व व त्याचे मित्र प्रतीक पाटील, जाधव, उदय कदम यांना शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने व दगडाने मारहाण केली. त्यानंतर पंधरा मिनिटांनी निगडी येथील एका शाळेजवळ पुन्हा वाद झाला. साहिल जाधव व अथर्व यांच्यात झालेल्या भांडणावरून अथर्व व त्याच्या साथीदारांनी कार्तिकला बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याला एका मोटारीत बसवून चिखलीच्या दिशेने नेले.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94330 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..