कुंभाड ते कुंभारवाडी रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभाड ते कुंभारवाडी रस्त्याचे काम 
तत्काळ मार्गी लावण्याची मागणी
कुंभाड ते कुंभारवाडी रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी

कुंभाड ते कुंभारवाडी रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी

sakal_logo
By

कुंभारवाडी रस्त्याचे काम
मार्गी लावण्याची मागणी

पिंपरी, ता. २९ ः मागील अनेक वर्षांपासून कुंभाड (कुंभारवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या भागातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. प्रलंबित कुंभाड गावठाण ते कुंभारवाडी ते बोरीचीपट्‍टी रस्त्याचे काम गणपती महोत्सवानंतर तत्काळ सुरू करावे. या मागणीचे निवेदन खेड-दापोली-मंडणगड मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्याकडे कोकण खेड, गाव कुंभाड, कुंभार समाज संघटना पिंपरी-चिंचवड शहरच्यावतीने देण्यात आले.
‘‘गावातील प्रमुख लोकवस्ती पासून कुंभार समाजातील पाच वाड्या अविकसित भागात राहत आहेत. भारतीय सेनेतून निवृत्त झालेले वृध्द माजी सैनिक, विधवा पेन्शनर, ज्येष्ठ शेतकरी नागरिक, कष्टकरी महिला, बांधव व लहान मुले यांना रस्त्याअभावी नाहक त्रास होऊन मरणयातना भोगाव्या लागत आहेत. शाळा, दवाखाना, रूग्णालय या भागापासून फार लांब असल्यामुळे अनेकदा या भागातील गरोदर महिला, आजारी ज्येष्ठ नागरिक, सर्पदंश झालेले युवक, आजारी माजी सैनिकांना वेळेत उपचार मिळत नाही. परिणामी, अनेकांना प्राणाला मुकावे लागले आहे. यावेळी आमदार कदम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावतो, असे आश्‍वासन दिले.
संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे प्रेक्षागृहात कोकण-खेड तालुका, अठरागांव रहिवासी विकास संस्थेने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात स्थानिकांनी निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शांताराम गुडेकर, तानाजी साळवी, अनिल नरवणकर, तुकाराम परबते, शिवाजी साळवी, सुरेश साळवी, मनोज साळवी, संतोष नरवणकर, पांडुरंग खेडेकर, संतोष परबते यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94690 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..