दारूसाठी पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूसाठी पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
दारूसाठी पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

दारूसाठी पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : दारूसाठी मंगळसूत्र मागितले असता ते न दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीनेही औषधी गोळ्या खाऊन व गळ्यावर ब्लेडने वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सांगवी येथे घडली.
हनाबाई सुभाष शिंपाळे (वय ५५, रा.सांगवी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुभाष शिंपाळे (वय ६०) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेली माहिती अशी, दारूसाठी पैसे हवे असल्याने पती सुभाष याने बुधवारी (ता. २४) पत्नी हनाबाई यांच्याशी भांडण केले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र मागितले असता ते न दिल्याने त्यांना लाथेने मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्याने उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बाब समजल्यानंतर सुभाष याने घरातील सर्व औषधी गोळ्या खाल्या तसेच गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे टोणपे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94990 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..