भंगारवालेही झाले डिजिटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंगारवालेही झाले डिजिटल
भंगारवालेही झाले डिजिटल

भंगारवालेही झाले डिजिटल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः रद्दी, पेपर, भंगारवाला..., असा आवाज गल्लीबोळात नेहमीच ऐकायला मिळतो. आपल्याकडील रद्दी किंवा भंगार घेऊन त्या बदल्यात रोख रक्कम भंगारवाल्याकडून मिळते, हा सर्वसाधारण अनुभव. अर्थात ही रक्कम अगदी तीस-चाळीस जास्तीत-जास्त शंभर रुपयांपर्यंत असू शकते. त्यामुळे ती रोखीने दिली जायची. आता ही रक्कमसुद्धा डिजिटल स्वरुपात अर्थात ‘गुगल पे’, ‘फोन पे’च्या माध्यामातून दिली आणि घेतली जात आहे. त्यामुळे भंगारवालेसुद्धा डिजिटल झाल्याचे दिसत आहे.

कोणत्याही सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथवा महिना, दोन महिन्यातून संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. त्यावेळी निघणारी रद्दी, लोखंड, तुटलेले-फुटलेले प्लास्टिक असे भंगार साहित्य विक्रीसाठी काढले जाते. भंगारवालेसुद्धा हातगाडी किंवा सायकलवर गल्लीबोळात फिरून भंगार विकत घेत असतात. त्यांच्याकडून भंगार अथवा रद्दीच्या मोबदल्यात पैसे दिले जातात. तेही लगतच्या परिसरातील भंगार माल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडे जाऊन भंगार विकतात. साधारणतः सात ते १० रुपये किलोप्रमाणे रद्दी, १५ ते २० रुपये किलोप्रमाणे लोखंड, पत्रा भंगारवाले विकत घेतात. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी रक्कम ही फारसी नसते. त्यामुळे ती रोखीने मिळायची. मात्र, बहुतांश व्यवहार सध्या डिजिटल स्वरुपात होत असल्याने भंगारवालेही ऑनलाइनच पैसे देत असतात. त्यामुळे रोखीचे व्यवहार खूपच कमी होऊ लागले असल्याचे चित्र आहे.

गणपती उत्सवासाठी घराची साफसफाई केली. मुलांच्या वह्या-पुस्तकांची एक-दीड किलो रद्दी होती. बरेच दिवस जुना टीव्ही बंद अवस्थेत घरात पडून होता. तो भंगारवाल्याला दिला. त्याने टिव्हीचे शंभर रुपये गुगल पे द्वारे दिले व रद्दीचे २० रुपये रोख दिले.
- लक्ष्मी, गृहिणी, कासारवाडी

व्यापारीही आम्हाला ऑनलाइनच पैसे देतो. त्यामुळे रोकड जरा कमी असते. पन्नास रुपयांच्या पुढे पैसे द्यायचे असल्यास ‘गुगुल पे’ नाही तर ‘फोन पे’ करतो. भंगाराचे किरकोळ १५-२० रुपये झाल्यास रोखीने देतो. जास्त रोख रक्कम नसते जवळ.
- मोहम्मद शेख, भंगारवाला

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95101 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..