गणेशोत्सवानिमित्त विविध शास्त्रीय नृत्यरचना सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवानिमित्त विविध 
शास्त्रीय नृत्यरचना सादर
गणेशोत्सवानिमित्त विविध शास्त्रीय नृत्यरचना सादर

गणेशोत्सवानिमित्त विविध शास्त्रीय नृत्यरचना सादर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः चिंचवडमधील नृत्यशिल्प नृत्‍यसंस्थेने गणेशोत्सवानिमित्त विविध शास्त्रीय नृत्यरचना सादर केल्या. मनोरम शाळेत कार्यक्रम पार पडला.

या वेळी विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, सतारवादन, पियानो वादन, तबला व गायन या कलांमधून लाडक्या गणपती बाप्पाची कलासेवा केली. संस्कार घोरपडे याने सतार वादन, अनिर्वेद पदकी याने पियानो, श्रीद टाकळकर याने तबला वादन केले. हर्षदा पिसोळकर हिने सुमधुर आवाजात गायन केले. नृत्यशिल्पच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यममधील गणेशावर आधारित नृत्यरचना सादर केल्या.
अक्षया दिवाण व धनश्री गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. स्वरदा अणावकर, प्रांजली शिंगटे यांनी गणेशा गुणेशा कार्यक्रम सादर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95236 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..