गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

क्रेडिट कार्डद्वारे परस्पर पैसे काढून
डुडुळगावात ५० हजारांची फसवणूक
पिंपरी, ता. ३० : आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर ४९ हजार ५३२ रुपये काढून घेत गणेश पोपटराव शेरमाळे (रा. हिलसाईड सोसायटी, डुडुळगाव) यांची फसवणूक केली. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने कोणताही व्यवहार न करता, कोणतीही माहिती कोणालाही न देता अज्ञात व्यक्तीने ही रक्कम काढली.

चिखलीत ट्रकमधून ८० गॅस सिलिंडर चोरीला
चिखलीतील मोरे वस्तीतील काळभोर कॉलनीजवळील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी व्यावसायिक वापराचे ८० गॅस सिलिंडर चोरले. याप्रकरणी भिकचंद हिरालाल कात्रेला (रा. मोरेवस्ती, चिखली, मूळ- उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. आरोपींनी सुरुवातीला ट्रकच्या फाळक्याच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप कटरच्या साहाय्याने कापण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलूप कापले न गेल्याने दरवाजाचा रॉड काढून ट्रकमधील प्रत्येकी चार हजार ४९२ रुपये किमतीचा ८० व्यावसायिक भरलेले गॅस सिलेंडर छोट्या टेम्पोतून चोरले.

भांडणे सोडविल्याच्या रागातून काळेवाडीत मारहाण
भांडणे सोडविल्याचा राग मनात धरून काळेवाडीतील तापकीर मळा चौक येथे तिघांना मारहाण केली. याप्रकरणी सलीम नजर महम्मद खान (रा. तापकीर मळा चौक, काळेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सीताराम चौधरी (वय २०, रा. ज्योतिबानगर,काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर पोन्द्या पोतदार, शुभम जाधव, निऱ्या याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने त्याच्या मित्राशी झालेली भांडणे सोडविली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व सोनू विनोद राम यांना लाथाबुक्क्यांनी व रॉडने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी मध्ये आली असता त्यांनाही गट्टू फेकून मारला. यामध्ये ते जखमी झाले.

तरुणीला धमकी, शिवीगाळ; एकावर गुन्हा
लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणीला धमकी व शिवीगाळ केली. तरुणीच्या नावाचे अकाउंट तयार करून फोटो अपलोड केले. तिच्या होणाऱ्या पतीला काहीही सांगून धमकी दिली. लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गोपाळ दत्तात्रेय बनसोडे (वय ३०, रा. आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
देहूतील विठ्ठलवाडी येथे घरात शिरून अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले. मुलीने आरोपीला ढकलले असता त्याने मुलीला मारहाण केली. त्यावेळी मुलीने घरातील भाजी कापण्याचा चाकू आरोपीला मारला. त्यावेळी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95272 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..