चांदीच्या पूजा साहित्याला मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदीच्या पूजा साहित्याला मागणी
चांदीच्या पूजा साहित्याला मागणी

चांदीच्या पूजा साहित्याला मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता.३० ः शहरातील सराफी पेढ्यांमध्ये सोने-चांदीच्या गणेशमूर्ती, अलंकार, दूर्वा, मोदक, जास्वंद हार यासारख्या पूजेच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. १२० रुपयांपासून दूर्वा, तर ११०० रुपयांपासून जास्वंदाचे हार उपलब्ध आहेत. दीड इंच ते २१ इंचापर्यंतच्या चांदीच्या मूर्तींच्या किंमती ७०० रुपयांपासून ते एक लाखापर्यंत आहेत. याशिवाय नाजूक दूर्वा, मीनावर्क केलेली जास्वंदाची फुले, मोदक, रत्नजडित मुकुट, सुंदर हार, उंदीर यासह असंख्य चांदी आणि सोन्याचे दागिने गणरायासाठी सराफी पेढ्यांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या वस्तूंना पसंती
पूजा साहित्यामध्ये दूर्वा, जास्वंदीच्या फुलांचे हार, कमळ, नारळ, शमीची पाने, तोरण, पाच फळांचे सेट, तबकडी, पंचपाळे, समई, दिवे, ताम्हण, पळी पंचपात्रे अशा वस्तूंचा समावेश आहे. सोन्याच्या वस्तूंनाही मागणी वाढली आहे. काही सराफांनी गणेश अलंकार, पूजा साहित्य असे सेट तयार केले आहेत.

अत्यल्प दर
दूर्वांची जुडी १२०तर जास्वंद फुलांची माळ ११०० आणि गणेशाची मूर्ती चार हजार रुपयांपासून असल्याने सर्वसामान्यांनाही ती परवडते. याचमुळे दरवर्षी मागणी वाढत चालली आहे. चांदीमध्ये पूजा साहित्य, मोदक, मुषक यांचे वेगवेगळ्या वजनातील प्रकार तर सोने-चांदीच्या मूर्ती सराफांकडे उपलब्ध आहेत. भरपूर प्रकार आणि बजेटनुसार उपलब्धता यामुळे सोने-चांदीच्या मूर्ती, पूजेचे साहित्य यांची मागणी सातत्याने वाढत आहे.

चांदीच्या दरात घसरण
गेल्यावर्षीच्या तुलनेत चांदीला किलोमागे १० हजार रुपयांचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातूनच अनेक सराफ पेढ्यांमध्ये ‘चांदी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

चांदीचे साहित्य - किंमत (रुपयात)
-गणेश मूर्ती - ७०० ते १ लाखापर्यंत
-मोदक - १५० पासून सुरवात
-दूर्वांची जुडी -१२० ते ५ हजार
-जास्वंद फुलांचा हार-११०० ते ५ हजार पर्यंत
-मुषक - ३०० ते ५ हजार पर्यंत
- नारळ-२१०० ते ११ हजारपर्यंत
-पाच फळांचा सेट - २१००पासून सुरवात
-पंचपाळे - ७००पासून सुरवात

कोट
‘‘यंदाच्या गणेशोत्सवात ग्राहकांनी खरेदीवर भर दिलेला आहे. महिला ग्राहकांकडून चांदीच्या मूर्ती, अलंकार अन‌् पूजेच्या वस्तूंना पसंती मिळत आहे. एकूणच सराफी बाजारात मोठ्या उलाढालीचे वातावरण आहे.’’
-दिलीप सोनिगरा, संचालक, दिलीप सोनिगरा ज्वेलर्स चिंचवडगाव
--
‘‘दोन-तीन महिन्यांपासूनच चांदीच्या खरेदीला वेग आलेला आहे. यावर्षी दरात घसरण झाल्यामुळे आम्ही ‘चांदी महोत्सव’ भरवला आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ’’
-रवी कावेडिया, संचालक, कावेडिया ज्वेलर्स, जुनी सांगवी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95329 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..