पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्मार्ट सिटीतर्फे ऑनलाइन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी 
स्मार्ट सिटीतर्फे ऑनलाइन स्पर्धा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्मार्ट सिटीतर्फे ऑनलाइन स्पर्धा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्मार्ट सिटीतर्फे ऑनलाइन स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः स्मार्ट सिटी व महापालिका स्मार्ट सारथी यांच्यातर्फे नागरिकांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. समाजप्रबोधन व नागरिकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन गटात स्पर्धा होईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पर्यावरणपूरक सजावट, गणेशमूर्तीची सर्वोत्कृष्ट सजावट, सर्वोत्कृष्ट समाज प्रबोधनपर सजावट किंवा कार्यक्रम यापैकी एक विषय निवडावा. स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी इच्छुकांनी गणेशोत्सवाचे छायाचित्र व त्याची थोडक्यात माहिती पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर https://bit.ly/EcoFriendlyGaneshFestivalPCMC या लिंकवर क्लिक करून भरावी. सहभागासाठी रविवारपर्यंत (ता. ४) मुदत आहे. परीक्षकांकडून निवडलेल्या १० स्पर्धक दुसऱ्या फेरसाठी पात्र ठरतील. त्यांच्या सजावटीची छायाचित्रे दुसऱ्या फेरीसाठी पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर प्रसिद्ध केले जातील. त्यापूर्वी दोन दिवस आधी संबंधित स्पर्धकाला सूचित केले जाईल. प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या छायाचित्राला जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी तीन दिवस मिळतील. स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी स्पर्धकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या फेसबुक पेजला फॉलो करून जास्तीत जास्त लाईक मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही गटातील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिले जाईल. स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित सर्वोत्कृष्ट देखाव्याला विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाईल. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सर्व हक्क पीसीएमसी स्मार्ट सारथीकडे राखून ठेवले आहेत. स्पर्धकांनी सादर केलेली छायाचित्रे, माहिती तथ्यांवर आधारित असणे अनिवार्य आहे. सादर केलेल्या माहितीच्या सत्यतेच्या संदर्भात स्पर्धक सर्वस्वी जबाबदार असतील.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95362 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..