अजमेरा कॉलनीतील रस्ता ‘अर्बन’नुसार सुशोभित होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजमेरा कॉलनीतील रस्ता
‘अर्बन’नुसार सुशोभित होणार
अजमेरा कॉलनीतील रस्ता ‘अर्बन’नुसार सुशोभित होणार

अजमेरा कॉलनीतील रस्ता ‘अर्बन’नुसार सुशोभित होणार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः अजमेरा व मासुळकर कॉलनीतील रसरंग चौक ते म्हाडा कॉर्नर रस्ता अर्बन स्ट्रीट आराखड्यानुसार सुशोभिकरण केला जाणार आहे. त्यासाठी एक कोटी ३१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासह महापालिका सभा, स्थायी व विधी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या सहा कोटी ६८ लाख रुपये खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी मंजुरी दिली.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप उपस्थित होते. ग प्रभागातील स्मशानभूमीत गॅस दाहिनीसाठी गॅस जोडणीसाठी एमएनजीएल कंपनीला १३ लाख रुपये देणे; प्रायमरी डाटा सेंटर कार्यान्वित ठेवण्यासाठी एक वर्षांकरिता ४९ लाख; नवीन थेरगाव, नवीन आकुर्डी, नवीन भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालयांच्या विविध परवाना शुल्कापोटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला १२ लाख रुपये; निगडी मिलिंदनगर परिसरात पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी १८ लाख; मोहननगर, काळभोरनगर परिसरातील रस्त्यांचे मजबुतीकरण व विद्युतविषयक कामांसाठी ३१ लाख; प्रभाग आठमधील वैष्णव माता शाळेसमोरील मोकळ्या जागेत उद्यान व योगा केंद्र उभारण्यासाठी एक कोटी ५८ लाख; ह प्रभागातील जलनि:सारण नलिकांच्या साफसफाईसाठी एक कोटी ३१ लाख; याच प्रभाग क्षेत्रात जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी ८४ लाख रुपये खर्चासहही सिंह यांनी मान्यता दिली.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95373 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..