‘ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा
‘ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा

‘ज्येष्ठ नागरिक दिन’ उत्साहात साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः गुड सॅमरिटन ग्रुप आणि महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद यांच्यावतीने ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ निमित्त ज्यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिवर्षी २१ ऑगस्टला संपूर्ण जगामध्ये जागतिक ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा केला जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्याचा गाडा हाकताना, निःस्पृहपणे कोणत्याही परताव्याची अपेक्षा न बाळगता, समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या कृतकर्मी ज्येष्ठांची दखल घेणे हे समाजाचे कर्तव्यच आहे. त्यांचे कौतुक, प्रशंसा करण्याचा, त्यांना मनोबल आणि आधार देण्याचा हा दिवस आहे. अशा ज्येष्ठांच्या घरी जाऊन शाल, पुष्प, सन्मान चिन्ह देऊन व पेढा भरवून सन्मान करण्यात आला. यात प्रेमानंद गोरे (जुनी सांगवी), जेम्स काळे (पिंपळे सौदागर), इरावती साळवी (बाणेर), रेव्हरंड मनोहर पवार (नवी सांगवी), कुमुदिनी मिसाळ (काळेवाडी), रेव्हरंड एम. डी. बोर्डे (विक्रोळी, मुंबई), प्रकाश मुदलियार (भूगाव), गुलाब मिरपगार (पिंपरी), फिलिप अर्सुड (तळेगाव), रामदास मोहोड (वाघोली) या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल असूर्लेकर, प्रसिद्ध उद्योगपती विश्वासराव दळवी, विधी अधिकारी ॲड. प्रसाद सांगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिशप डॉ. सतीश यंगड, अनिकेत रोकडे, मनोज पिल्ले, प्रफुल्ल असूर्लेकर यांनी सहकार्य केले. पास्टर बन्यामिन काळे, डेव्हिड काळे सॅमसन चोपडे, वनिता पिल्ले, शैला हेक्टर, ग्लोरी पिल्ले, संजय कांबळे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95540 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..