श्रमजीवी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमजीवी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
श्रमजीवी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

श्रमजीवी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : काळेवाडी येथील श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृह येथे उत्साहात पार पडली. या सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद हजर होते. सामाजिक बांधिलकी म्हणून सभेत संस्थेने सभासदांच्या पाल्यांचा शालोपयोगी साहित्य देऊन गुणगौरव केलेला आहे.
पतसंस्थेने दहावी व बारावीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार रोख पारितोषिक व भेटवस्तू देवून करण्यात आला. संस्थेने सभासदांसाठी ८ टक्के लाभांशाची घोषणा केली आहे.
पिंपरी- चिंचवड पुणे परिसरातील गेली ३४ वर्ष श्रमिक, कामगार वर्गाचे आर्थिक हित जपणारी व खऱ्या अर्थाने श्रमजीवी वर्गाची सर्वसामान्यांनी चालवलेली, अशीही पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्वात जुनी वैशिष्ट्यपूर्ण पतसंस्था आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह ४ शाखा असून सर्व शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. संस्थेचा १११ कोटीचा व्यवसाय आहे. संस्थेस नुकताच ‘बँको’ आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झालेला असून गेल्या ३४ वर्षात संस्थेने अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. संस्थेस स्थापनेपासून गेली ३४ वर्ष ऑडिट वर्ग ‘अ’ आहे.
सभेत नामांकित व्याख्याते अशोक देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना ‘हसत खेळत अभ्यास’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विजुअण्णा जगताप, सुरेश तावरे, सुभाष नलवडे, श्रीकृष्णा दीक्षित, शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
पतसंस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, उपाध्यक्ष तानाजी चौगुले व महाव्यवस्थापक विजय वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन पाथुरकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक धर्माजी साबळे व प्रवीण ढमाळ यांनी आभार मानले.
फोटोः 88114

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95624 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..